Home /News /career /

उच्चाधिकारी बनलेल्या मुलीला पाहून इन्स्पेक्टर वडिलांचं उर आलं भरून; कडक सॅल्युट मारतानाचा PHOTO व्हायरल

उच्चाधिकारी बनलेल्या मुलीला पाहून इन्स्पेक्टर वडिलांचं उर आलं भरून; कडक सॅल्युट मारतानाचा PHOTO व्हायरल

ITBP चे पोलीस निरीक्षक कमलेश कुमार आपल्या अधिकारी झालेल्या मुलीला सॅल्युट करताना...(PC-ITBP)

ITBP चे पोलीस निरीक्षक कमलेश कुमार आपल्या अधिकारी झालेल्या मुलीला सॅल्युट करताना...(PC-ITBP)

मुलगी जर वडिलांपेक्षा मोठी अधिकारी बनली तर वडिलांचा आनंद शब्दांत मांडता न येणारा असतो. असंच काहीसं चित्र इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) च्या पासिंग आऊट परेडमध्ये (Passing Out Parade) दिसलं आहे.

    नवी दिल्ली, 10 ऑगस्ट: प्रत्येक वडिलांना आपल्या मुलीचा अभिमान असतो. पण हीच मुलगी जर वडिलांपेक्षा मोठी अधिकारी बनली तर वडिलांचा आनंद शब्दांत मांडता न येणारा असतो. असंच काहीसं चित्र इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) च्या पासिंग आऊट परेडमध्ये (Passing Out Parade) दिसलं आहे. जिथे इन्स्पेक्टर असणाऱ्या वडिलांनी सहाय्यक कमांडंट बनलेल्या मुलीला कडक सॅल्युट (Father salute daughter) केला आहे. इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसमध्ये निरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या कमलेश कुमार (Inspector Kamlesh Kumar) यांच्यासाठी रविवारचा हा क्षण अविस्मरणीय होता. कमलेश कुमार यांची मुलगी दीक्षा ही इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसात नुकतीच सहाय्यक कमांडंट पदावर नियुक्त झाली आहे. आयटीबीपीमध्ये या पदावर नियुक्त झालेल्या दोन महिला अधिकाऱ्यांपैकी दीक्षा ही एक आहे. पोलीस निरीक्षक कमलेश कुमार यांची मुलगी त्यांच्यासमोर पोहोचल्यानंतर, त्यांचा उर भरुन आला. उच्चाधिकारी झालेल्या मुलीला पाहून त्यांनी तिला कडक सॅल्युट केला आहे. मुलीला वडिलांनी केलेल्या सॅल्युटचे फोटो सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहेत. हेही वाचा-IAS अधिकारी नम्रता जैन त्यांच्या जिद्दीला सलाम! IPS होऊनही दिली UPSCची परीक्षा खरंतर, आयटीबीपीनं 2016 मध्ये यूपीएससी परीक्षेद्वारे महिला लढाऊ अधिकाऱ्यांची कंपनी कमांडर म्हणून भरती केली होती. दीक्षाची देखील याच परीक्षेमधून निवड करण्यात आली आहे. दरम्यान, ITBP अकॅडमी मसूरीच्या (ITBP Academy Mussoorie) पासिंग आऊट परेडमध्ये दीक्षा तिचे वडील कमलेश कुमार यांच्यासमोर आली, तेव्हा कमलेश हे स्वतःला रोखू शकले नाहीत. त्यांनी आपल्या मुलीला सलाम केला आहे. यावेळी कमलेश कुमार यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या मुलीबद्दलचा अभिमान स्पष्टपणे दिसत होता. हेही वाचा-IAS सचिन गुप्तांनी इंजिनिअरिंगनंतर दिली UPSC परीक्षा; तिसऱ्या प्रयत्नात टॉपर वडील आणि मुलीचा हा खास क्षण ITBP ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. सध्या हा फोटो  सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करताना ITBP नं लिहिलं की, 'हृदयस्पर्शी फोटोत इन्स्पेक्टर कमलेश कुमार यांनी आपल्या अधिकारी झालेल्या मुलीला सलाम केला.' हेही वाचा-UPSCच्या तयारीसाठी वडिलांनी विकलं घर; प्रदीप सिंहांनी IAS होऊन कष्टाचं केलं चीज संबंधित पासिंग आऊट परेडसाठी मुख्य अतिथी म्हणून उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हजेरी लावली होती. आयटीबीपीचे महासंचालक एस एस देसवाल यांच्यासह मुख्यमंत्री धामी यांनी सहाय्यक कमांडंट बनलेल्या प्रकृती आणि दीक्षा या दोन महिला अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बॅच लावली आहे. या पासिंग आऊट परेड दरम्यान, नवीन नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांनी देशाची सेवा आणि संरक्षण करण्याची शपथ घेतली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या