Home /News /maharashtra /

महाड: पत्नीच्या निधनानंतर काही तासातच पतीनंही घेतला जगाचा निरोप, एकाच सरणावर दोघांवर अंत्यसंस्कार

महाड: पत्नीच्या निधनानंतर काही तासातच पतीनंही घेतला जगाचा निरोप, एकाच सरणावर दोघांवर अंत्यसंस्कार

महाडमध्ये (Mahad) मनाला चटका लागेल अशी घटना घडली आहे. वाचा संपूर्ण वृत्त.

रायगड, 10 ऑगस्ट: महाडमध्ये (Mahad) मनाला चटका लागेल अशी घटना घडली आहे. एकाच दिवशी दाम्पत्याचा मृत्यू (Death of an elderly couple) झाला आहे. पण घटना काहीशी वेगळी आहे. पत्नीच्या निधनानंतर काही तासातच पतीनंही जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे एकाच सरणावर दोघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आलेत. पत्नीच्या निधनानंतर अवघ्या काही तासातच पतीने जगाचा निरोप घेतल्याची घटना रविवारी महाड तालुक्यातील रेवतळे येथे घडली.  विठोबा आंग्रे वय 72 आणि चंद्रभागा आंग्रे वय 65 असं मृत दाम्पत्याचं नाव आहे. वृध्द पती - पत्नी गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते. Watch Video: लसीकरणासाठी अशी झुंबड कधी पाहिली आहे का? शनिवारी पहाटे प्रथम पत्नीचे निधन झाले आणि त्यानंतर काही तासात पतीने ही प्राणत्याग केला. या घटनेनंतर भावकी आणि गावकीने एकत्र बसून या दांपत्यावर एकत्र अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेत तो अंमलात आणला. दोघांची एकत्र अंत्ययात्रा काढण्यात आली आणि एकाच सरणावर या दाम्पत्यावर अत्यसंस्कार करण्यात आले.  लग्नापासून सुरु झालेले हे सहजीवन एकाच वेळेस संपून दाम्पत्यानं एकाच सरणावर जगाचा निरोप घेण्याची घटना अपवादानेच घडते. रेवतळे येथील वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूने या अपवादाचा अनुभव आल्याची चर्चा सर्वत्र केली जात आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Death, Funeral, Mahad

पुढील बातम्या