मुंबई, 20 डिसेंबर : घोडा (Horse video) ज्याला शाकाहारी प्राणी समजलं जातं. एरवी गवत खाताना तो दिसतो. पण अशाच घोड्याने चक्क एका कोंबडीच्या पिल्लाला खाल्लं आहे (Horse ate baby chicks). आईसमोरच तिच्या पिल्लाला घोड्याने जिवंत गिळलं आहे (Horse ate baby chicks in front of its mother). घोड्याचा हा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. घोड्याचं असं रूप तुम्हीही कधीच पाहिलं नसेल. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला घोडा, कोंबडी आणि कोंबडीची तीन पिल्लं दिसत आहेत. पाहताना व्हिडीओ अगदी सामान्य वाटतो. पण पुढे जे घडतं ते पाहून धक्काच बसतो. कोंबडीच्या पिल्लांकडे तोंड नेणारा घोडा असं काही करू शकतो, याचंच आश्चर्य वाटतं. खरंतर व्हिडीओ पाहिल्यानंतर आपला आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही. हे वाचा - हत्तीचा तरुणावर खतरनाक हल्ला; पळव पळव पळवलं आणि…, अंगावर काटा आणणारा VIDEO घोडा कोंबडीच्या पिल्लांकडे तोंड नेतो. कोंबडीही तिथंच आसपास असते. घोड्याचं तोंड पिल्लांजवळ आहे, त्यामुळे आपल्यालाही तो या पिल्लांशी खेळतो आहे असचं वाटतं. आता घोड्यापासून आपल्या पिल्लांना तसा काही धोका नाही हे कोंबडीला माहिती आहे, त्यामुळे जरी घोडा पिल्लांजवळ असला तरी कोंबडी बिनधास्त असते. ती थोड्या वेळासाठी आपल्या पिल्लांपासून थोडी दूर जाते आणि त्याचवेळी घोडा संधी साधतो.
तीन पिल्लांपैकी घोडा एका पिल्लाला आपल्या तोंडात घेतो. घोडा कोंबडीच्या पिल्लाला जिवंत गिळतो, त्याला खाताना तो दिसतो. आपल्या पिल्लाला घोड्याच्या जबड्यात पाहताच त्याला वाचवण्यासाठी आई तिथं येते. ती घोड्यावर हल्ला करते. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. घोड्याने पिल्लाला गिळलेलं असतं. घोड्याचा हा धक्कादायक व्हिडीओ nature27_12 इन्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हे वाचा - VIDEO - बापरे! तोंडात पाय धरला आणि…; चक्क कासवाने केला कुत्र्यावर खतरनाक हल्ला व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येक जण हैराण आहे. घोडा असं काही करू शकतो, यावर कुणाचा विश्वासच बसत नाही आहे. खरंच घोड्याने कोंबडीच्या पिल्लाला खाल्लं का असा प्रश्न एका युझरने विचारला आहे. तर काही युझर्सनी व्हिडीओ शूट करणाऱ्यावर संताप व्यक्त केला आहे. घोड्याला तिथून हाकललं असतं तर कोंबडीचं पिल्लू वाचलं असतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.