जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चुकीनंतरही मिळाला होता एक चान्स, पण ओव्हर कॉन्फिडन्सने जीव घेतला; मृत्यूचा थरारक VIDEO

चुकीनंतरही मिळाला होता एक चान्स, पण ओव्हर कॉन्फिडन्सने जीव घेतला; मृत्यूचा थरारक VIDEO

मृत्यूचा थरारक व्हिडीओ. (फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)

मृत्यूचा थरारक व्हिडीओ. (फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)

चूक केल्यानंतर तो एकदा बचावला पण दुसऱ्यांदा त्याला मृत्यूने गाठलंच.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 जुलै : काही लोक हिरोगिरी करण्याच्या नादात असं काहीतरी करून बसतात की ते त्यांच्या जीवावर बेततं. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात तीन तरुणांनी एक चूक केली. या चुकीनंतरही त्यांना जीव वाचवण्याची संधी होती. पण तरी त्यापैकी एका तरुणाने ओव्हर कॉन्फि़डन्स दाखवला आणि तिथंच त्याचा जीव गेला. हे तीन तरुण रेल्वे ट्रॅकवर मस्ती करत होते. समोरून भरधाव ट्रेन येत होती. हे तरुण त्या ट्रेनलाच चॅलेंज करत त्याच्यासमोर उभे राहिले. सुदैवाने ट्रेन त्यांना धडकण्याआधीच ते ट्रॅकवरून बाजूला झाले. इतक्या मोठ्या चुकीनंतरही नशीबाने त्यांचा जीव वाचला. पण पुन्हा तीच चूक, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तरुण असं काही करून बसला की पुढच्याच क्षणी त्याचा मृत्यू झाला. Railway Accident : धक्का लागला आणि तरुण जागेवरच संपला; मुंबईच्या मालाड स्टेशनवरील Shocking Video मृत्यूचा हा थरारक असा लाइव्ह व्हिडीओ. ज्यात तुम्ही पाहू सकता तीन तरुण रेल्वे ट्रॅकवर उभे आहेत. समोरून ट्रेन येत आहेत. त्या ट्रेनकडे पाहत ते तिथेच उभे आहेत. ट्रेन येईपर्यंत तिथं उभं राहायचं, असं चॅलेंज त्यांच्यात लागली आहे. आता ही ट्रेन यांना उडवते की काय, अशी धाकधूक आपल्या मनात होते. जशी ट्रेन त्यांच्या अगदी जवळ ते तिघंही बाजूला होतात. तेव्हा कुठे आपल्याही जीवात जीव येतो. दोन तरुण ट्रेनपासून थोडे दूर होतात. पण एक तरुण मात्र तिथंच उभा राहतो. ट्रेनची धडक त्याला बसते आणि तो धाडकन कोसळतो. व्हिडीओत तरुणाचं पुढे काय झालं ते दिसत नाही. पण त्याचा मृत्यू झाला असा दावा सोशल मीडियावर केला जातो आहे. जीवघेणा स्टंट, विजेच्या खांबावर उभं राहून पूर आलेल्या नदीत उड्या; तरुणांचा VIDEO व्हायरल @1000waystod1e नावाच्या ट्विटरवर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

जाहिरात

व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि अशी चूक तुम्ही बिलकुल करू नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात