जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Railway Accident : धक्का लागला आणि तरुण जागेवरच संपला; मुंबईच्या मालाड स्टेशनवरील Shocking Video

Railway Accident : धक्का लागला आणि तरुण जागेवरच संपला; मुंबईच्या मालाड स्टेशनवरील Shocking Video

मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनवर भयंकर दुर्घटना.

मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनवर भयंकर दुर्घटना.

मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनवरील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 30 जून : लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची लाइफलाइन. पण हीच लाइफलाइन अनेकांसाठी डेथलाइनही ठरली आहे. रेल्वे मध्ये चढताना हात निसटणं, पाय घसरणं अशा अनेक घटना आपण नेहमीच पाहत असतो. काही वेळा तर प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा जीव जातो. अशीच रेल्वे स्टेशनवरील एक धक्कादायक घटना. ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे. रेल्वे स्टेशनवर धक्का लागला आणि जागीच तरुणाचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात

मुंबईच्या मालाड रेल्वे सटेशनवरील ही धक्कादायक घटना आहे. स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये या घटनेचं दृश्य कैद झालं आहे. दोन तरुण मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तीनवर जेवणाचा डबा खातात. यानंतर ते डबा धुण्यासाठी रेल्वे ट्रॅककडे जातात. तिथे उभे असताना अचानक जलद लोकल येते. याच लोकलचा धक्का लागून अनर्थ घडतो.

Mumbai news : ती लोकलची वाट पाहत मोबाईलमध्ये बिझी होती, तो आला आणि मोबाईल घेऊन पळाला, LIVE VIDEO

ही घटना 17 जून या दिवशी दुपारी साडेतीन वाजताची असल्याची माहिती आहे. यावेळी दोन तरुण प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरील कट्ट्यावर बसून डबा खातात. एकत्र जेवण केल्यानंतर ते दोघंही जेवणाचा डबा आणि हात धुण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभे राहतात. मात्र यावेळी अचानक चर्चगेटच्या दिशेने बोरिवलीकडे जाणारी जलद लोकल आणि होत्याचं नव्हतं झालं. या ट्रेनची दोघांपैकी एकाला जोरदार धडक बसली आणि तो प्लॅटफॉर्मवर दूरपर्यंत फेकला गेला.

जाहिरात
नशीब म्हणावं की चमत्कार! लागोपाठ 3 बाईकने चिरडलं, तरी चिमुकली जिवंत; VIDEO VIRAL

या धडकेत त्याच्या डोक्याला जोरदार मार बसला आणि त्याच्या कानातून रक्तस्त्राव सुरु झाला. यानंतर त्याला उपचारांसाठी कांदिवलीच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं.

जाहिरात

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेहमीच प्रयत्नशील असते. वेळोवेळी रेल्वेकडून प्लॅटफॉर्म पासून दूर राहण्यासह विविध सूचनाही दिल्या जातात. प्रवाशांना जागृतही केलं जातं मात्र तरीही प्रवासी ही याकडे दुर्लक्ष करतात. मग यातून दुर्घटना घडताना दिसतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात