अखंड प्रताप सिंह, प्रतिनिधी कानपूर, 12 जुलै : पाप धुवून काढण्यासाठी ज्या गंगेत आंघोळ केली जाते, त्याच पवित्र गंगा घाटांवर सध्या मृत्यूचं प्रमाण वाढल्याची चर्चा आहे. याठिकाणी पोलीस अधिकारी तैनात नसतात, असा आरोप स्थानिकांनी केलाय. तर, वारंवार सूचना देऊनही लोक बॅरिकेड्स ओलांडून गंगेच्या पाण्यात खोलवर पोहायला जातात, असं पोलिसांनी म्हटलंय. अशातच एक व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून तुमच्या काळजाचा ठोकाच चुकेल. मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेशातील नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. गंगेचीही पाणीपातळी वाढली आहे. अशातच भैरव घाट किनाऱ्यावरील विजेच्या खांबांवर चढून काही तरुणांनी गंगेत उड्या मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दिसतंय त्यानुसार, विजेच्या उंच खांबांवरून उड्या मारणाऱ्या तरुणांना कोणीही थांबवत नाहीये. उलट आजूबाजूचे लोक उभे राहून ही स्टंटबाजी एन्जॉय करत आहेत. शिवाय घाटावर पोलीसही दिसत नाहीत.
सध्या पावसाचे दिवस असल्याने विजेच्या खांबांना स्पर्श करणंही जेवघेणं ठरू शकतं. अशातच थेट खांबांवर चढलेल्या या तरुणांच्या ही स्टंटबाजी जीवावरही बेतली असती. शिवाय गंगेच्या पाण्याचा अंदाज आला नसता तर बुडून दुर्घटना घडली असती. मात्र तरुणांनी याबाबत कसलाही विचार न करता सुस्साट उड्या मारल्या. त्यांना कोणी थांबवलंही नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे. मराठमोळ्या अभिनेत्याने 57 व्या वर्षी केलं सहाव्या गर्लफ्रेंडशी लग्न; पत्नी आहे 25 वर्षांनी लहान PHOTOS सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या तरुणांना चांगलंच धारेवर धरलं. घाटावर एकही पोलीस दिसत नसल्याने नाराजी व्यक्त केली. तसंच पावसाळ्यात सर्वांनी काळजी घ्या, असं जीवघेणं कृत्य करू नका, असं आवाहनही अनेकांनी केलं आहे.