हैदराबाद, 24 फेब्रुवारी : मृत्यू कुठे कधी कुणाला कसा गाठेल सांगू शकत नाही. चालता-बोलता, नाचता-गाता, हसतानाही मृत्यू ओढावल्याची बरीच प्रकरणं घडली आहे. असंच आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ज्यात एका पोलिसाचा अचानक मृत्यू झाला आहे. जिममध्ये एक्सरसाइझ करताना जीव गेला आहे. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. तेलंगणामधील ही धक्कादायक घटना आहे.
हैदराबादमधील मर्देपल्ली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल आपल्या घराजवळील जिममध्ये एक्सरसाइझ करत होता. वॉर्मअप सेशनदरम्यान त्याने पुशअप्स मारले. त्यानंतर तो उठला आणि दुसरी एक्सरसाइझ करायला गेला. तेव्हा अचानक तो जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. हे संपूर्ण दृश्य जिममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
Shocking! चिकन खाताच व्यक्तीला मारला लकवा; सुदैवाने मरता मरता वाचला
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता जमिनीवर बसलेला आहे, तो हाच पोलीस. जो तेव्हाच अस्वस्थ दिसतो आहे. काही वेळाने तो पुशअप्स मारतो आणि त्यानंतर उठून जिममधील एका मशीनजवळ येतो. तिथं येताच तो छातीवर हात ठेवतो. त्याच्या छातीतून कळ येत आहे, हे त्याच्या एक्स्प्रेशनवरून स्पष्ट दिसतं. त्यानंतर तो छाती धरूनच राहतो आणि तसाच जमिनीवर कोसळतो.
त्याची अशी अवस्था पाहून जिममधील सर्वजण घाबरतात. त्याच्या मदतीसाठी धावून येतात. माहितीनुसार त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याला वाचवता आलं नाही. त्याचा मृत्यू झाला.
Shocking! घास तोंडात आणि शरीराने सोडले प्राण, व्यक्तीचा जेवताना अचानक गेला जीव; मृत्यूचा LIVE VIDEO
एएनआयच्या ट्विटनुसार मर्देपल्ली पोलीस ठाण्याचे एसएचओ नेताजी यांनी याप्रकरणी केस नोंदवल्याचं म्हटलं आहे.
Telangana | A police constable died while exercising in the gym, in Hyderabad yesterday. He was taken to a hospital where he was declared brought dead. A case has been registered: Netaji, SHO Marredpally PS
— ANI (@ANI) February 24, 2023
एनएनआयच्या ट्विटमध्ये पोलिसांनी या पोलिसाच्या मृत्यूचं नेमकं कारण सांगितलेलं नाही. पण जीममधील या पोलिसाच्या मृत्यूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात या पोलिसाचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाल्याचं सांगितलं जातं आहे.
Watch CCTV Footage 👇 He died at gym due to heart attack. pic.twitter.com/FbA6hghS4E
— Arbaaz The Great (@ArbaazTheGreat1) February 23, 2023
जीममध्ये हार्ट अटॅक आल्याची अशी बरीच प्रकरणं समोर आली आहेत. याआधी नवी दिल्ली येथील अपोलो हॉस्पिटल मधील वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वनिता अरोरा म्हणाल्या, "सर्व लोकांनी जिममध्ये जाण्यापूर्वी कार्डियाक कन्सल्टंट करणे आवश्यक आहे. विशेषत: जे लोक 30 किंवा 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत, त्यांनी वेट लिफ्टिंग, कार्डिओ, वेट ट्रेनिंग, ट्रेडमिल करण्यापूर्वी कार्डिओलॉजिस्टला नक्कीच भेटावे. अनेक वेळा जीममुळे आपल्या हृदयाच्या ईसीजीमध्ये बदल होतात, पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. असे केल्याने हृदयविकाराचा झटका येतो. आजच्या युगात कोरोनरी आर्टरीचा आजार तरुणांमध्येही आढळतो, त्यामुळे हृदयाबाबत कोणत्याही वयात काळजी घेणे आवश्यक आहे"
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Heart Attack, Hyderabad, Lifestyle, Police, Telangana, Viral, Viral videos