लंडन, 24 फेब्रुवारी : चिकन म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. पण तुम्हाला माहिती आहे का हेच चिकन तुमच्या जीवावरही बेतू शकतं. एका तरुणाला याचा प्रत्यय आला आहे. चिकन खाताच या व्यक्तीला लकवा मारला आहे. तो जवळपास मृत्यूच्या दारातच गेला होता पण सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. चिकनच्या बाबतीत केलेली एक चूक या तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. यूकेतील हे धक्कादायक प्रकरण आहे. लंडनमध्ये राहणारा 43 वर्षांचा डेव्हिड मिलर एक साइकिलिस्ट आहे. त्याने कित्येक मॅरॉथॉनमध्येही सहभाग घेतला आहे. त्यामुळे त्याचं शरीर फिट आहे. त्याला चिकन खायला खूप आवडतं. तो आपल्या आवडत्या भारतीय रेस्टॉरंटमधून चिकन मागवतो. यावेळी त्याने रोस्टेड चिकन ऑर्डर केलं. पण हे चिकन खाणं त्याला महागात पडलं. त्यानंतर त्याच्यासोबत जे घडलं त्याचा त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. चिकन खाल्ल्यानंतर काही क्षणात त्याला चक्कर आली आणि तो खाली कोसळला. त्याच्या हातापायात झिणझिण्या आल्या. कुणीतरी त्याला पिन किंवा सुई टोचतं आहे असं वाटू लागलं. तो नीट श्वासही घेऊ शकत नव्हता. एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर हलताही येत नव्हतं. एका ठिकाणी एकाच अवस्थेत तो पडून होता. त्याची अशी भयंकर अवस्था पाहता त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शिजवण्यापूर्वी चिकन धुणं धोकादायक; संशोधनात समोर आले भयंकर दुष्परिणाम तिथं त्याला फूड पॉयझनिंग झाल्याचं निदान झालं. तसंच तो दुर्मिळ ऑटोइम्युन गुइलेन-बेरी सिंड्रोमच्या विळख्यात आला होता. डॉक्टरांनी सांगितलं, गुइलेन-बेरी सिंड्रोम एक दुर्मिळ न्युरोलॉजिकल कंडिशन आहे. यात रोगप्रतिकारक प्रणाली स्वतःवरच नकारात्मक पद्धतीने आक्रमण करते. इम्युन सिस्टम पेशींवरच हल्ला करू लागते, पेशींना हानी पोहोचवते. या सिंड्रोमची लागण झाल्यास सुरुवातीला श्वास घ्यायला त्रास होतो. त्यानंतर चेहऱ्यावरील नसा कमजोर होतात. हातापायांत झिणझिण्या जाणवतात आणि हळूहळू हा आजार संपूर्ण शरीरात पसरतो. जर या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर रुग्णाला लकवा मारतो. श्वास थांबल्याने मृत्यूही ओढावू शकतो ..
सामान्यपणे हा सिंड्रोम बॅक्टेरिअल किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे होतो. डेव्हिडला डॉक्टरांनी सांगितलं की अर्धवट शिजलेल्या चिकनमध्ये एक बॅक्टेरिया असतो, ज्यामुळे गुइलेन बेरी सिंड्रोम होऊ शकतो. डेव्हिडलाही चिकनमुळेच ही समस्या झाली. आश्चर्य! 24 वर्षे फक्त एका फळावर जगतेय ही व्यक्ती; आजारातूनही ठणठणीत झाल्याचा दावा आयसीयूमध्ये एक आठवडा त्याच्यावर उपचार सुरू होते. जवळपास अडीच महिने हो तीव्र गॅस्ट्रोएंटेराइटिसमुळे रुग्णालयात दाखल होता. त्यानंतरही त्याची प्रकृती फार सुधारली नाही. तो टीव्हीही पाहू शकत नव्हता. कारण त्याचे डोळे बंद होऊ लागले होते. कित्येक महिने तो आपल्या बायकोला-मुलांनाही ओळखत नव्हता. अडीच महिन्यांनंतर त्याला रुग्णालयातून डिस्जार्च देण्यात आला. त्यानंतर चालण्या-फिरण्यासाठी तो कुबड्या किंवा काठी वापरत असे. बऱ्याच महिन्यांच्या उपचारानंतर आता कुठे त्याची तब्येत सुधारली आहे आणि आता तो पुन्हा सायकल मॅरॉथॉनची तयारी करत आहे.