संजय तिवारी/भोपाळ, 18 फेब्रुवारी : जीवन-मृत्यू कुणाच्या हातात नाही. मृत्यू कधी, कुठे, कसा, कुणाला गाठेल सांगू शकत नाही. असाच मृत्यू चा एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका व्यक्तीचा जेवताना अचानक मृत्यू झाला आहे. व्यक्ती खाता खाता अचानक कोसळली आणि काही क्षणातच तिचा जीव गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आङे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती एका बेंचवर बसली आहे. मांडी घालून ती जेवण करते आहे. खाता खाता व्यक्ती मध्येच थोडी अस्वस्थ झाल्यासारखी दिसते. त्यानंतर काही वेळातच ती कोसळते. अगदी पुतळा कोसळावा तशी ही व्यक्ती बेंचवरून कोसळते. थोड्या वेळाने तिच्या शरीरातील हालचालही दिसत नाही. हे वाचा - मेडिकल टेस्ट करताना एक चूक, व्यक्तीचा धक्कादायक मृत्यू; तुम्हीही असं करत नाहीत ना? त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तपासलं. त्याच्यात कोणत्याच हालचाली जाणवत नव्हत्या. म्हणून त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ज्या क्षणी तो पडला तेव्हा तिथंच त्याचा मृत्यू झाला होता.
नॅशनल हायवे-44 वरील मालथौम टोल प्लाझावरील हे दृश्य आहे. मृत व्यक्तीचं नाव उदल यादव आहे. ती याच टोल प्लाझावर सुरक्षारक्षकाचं काम करत होती. तो ड्युटीवर होता, जेवण करत होता, त्याचं ताटातलं जेवण संपलंही नव्हतं. तोंडात आणि हातात घेतलेला घास तसाच राहिला आणि त्याच्या शरीराने प्राण सोडले.
And when death came while eating.. Video of death of guard Udal of Sagar district's toll plaza#MadhyaPradesh #india #viralvideo pic.twitter.com/EvktH9QKBN
— Siraj Noorani (@sirajnoorani) February 17, 2023
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, @sirajnoorani ट्विटर अकाऊंटवरील हा व्हिडीओ आहे. जो पाहून सर्वांना धक्का बसला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.