मराठी बातम्या /बातम्या /Viral /

महिलेनं बाळाच्या हातात दिली केळी; अवघ्या 30 सेकंदातच चिमुकल्याचा मृत्यू, कारण वाचून व्हाल शॉक

महिलेनं बाळाच्या हातात दिली केळी; अवघ्या 30 सेकंदातच चिमुकल्याचा मृत्यू, कारण वाचून व्हाल शॉक

Image: ugc

Image: ugc

महिलेनं आपल्या बाळाला झोपण्याच्या आधी दुधाच्या बाटलीच्या जागी केळी दिली. यानंतर 30 सेकंदातच जेव्हा ही महिला परत आली तेव्हा तिच्या बाळाचा मृत्यू झाला होता

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 19 डिसेंबर : एका आईच्या हलगर्जीपणामुळे तिच्या दोन वर्षाचा मुलाचा अवघ्या 30 सेकंदात दुर्देवी अंत झाला. ही घटना यूनायडेट किंगडमच्या वेल्समध्ये घडली. यात महिलेनं आपल्या बाळाला झोपण्याच्या आधी दुधाच्या बाटलीच्या जागी केळी दिली. यानंतर 30 सेकंदातच जेव्हा ही महिला परत आली तेव्हा तिच्या बाळाचा मृत्यू झाला होता (Baby Died After Eating Banana).

OMG! वयाच्या पहिल्या वर्षातच चिमुकला भलताच मोठा झाला; लेकाला पाहून आईही शॉक

नॉर्थ वेल्स लाईव्ह न्यूजच्या वृत्तानुसार, यूनायटेड किंगडमच्या वेल्समध्ये राहणारी डेनिएल बटरली हिने डायल जॉन जेम्स ग्रीग नावाच्या आपल्या बाळाला झोपण्याआधी चुकून दुधाच्या बाटलीच्या जागी केळी दिली. यानंतर काहीतरी कामासाठी ती खोलीतून बाहेर गेली. अवघ्या अर्ध्या मिनिटातच ती खोलीत परत आली, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. खोलीत येताच तिला दिसलं की तिच्या बाळाच्या गळ्यात केळी अडकली होती. यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. हे पाहून तिला धक्का बसला आणि लगेचच तिने 999 नंबरवर कॉल करून मदत मागितली.

महिलेनं सांगितलं की त्यावेळी माझं बाळ जसे आवाज काढत होतं ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. तिचं बाळ अतिशय वेदनेत होतं. मात्र हे सर्व डोळ्यांनी पाहूनही ती काहीच करू शकली नाही. डेनिएलने सांगितलं की तिने आपल्या बाळाला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र मुलाच्या गळ्यातील केळीचा तुकडा काढण्यात अपयशी ठरली. हा तुकडा आणखीच आत गेला. यामुळे तिचा मुलगा वेदनेने ओरडू लागला.

अजबच! ना परफ्युम वापरत ना डिओ; तरी या महिलेच्या शरीरातून येतो सुगंध

महिलेनं सांगितलं की याचदरम्यान तिची बहीण आणि दाजीही तिथेच आलेले होते. मात्र खूप प्रय़त्न करूनही ते या बाळाला वाचवू शकले नाही. महिलेनं रडत सांगितलं, की तिच्या मुलाने जागीच जीव सोडला. ती रात्र ही महिला आयुष्यभर विसरू शकत नाही. डॉक्टरांनी सांगितलं की बाळाचा मृत्यू हायपोक्सिक कार्डियक अरेस्टमुळे झाला आहे.

First published:

Tags: Baby died, Fruit