मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /OMG! वयाच्या पहिल्या वर्षातच चिमुकला भलताच मोठा झाला; लेकाला पाहून आईलाही बसला धक्का

OMG! वयाच्या पहिल्या वर्षातच चिमुकला भलताच मोठा झाला; लेकाला पाहून आईलाही बसला धक्का

सॉरी म्हणण्याची सवय लावा - 

अनेकदा कितीही मोठी चूक झाली तरी मुलं सॉरी म्हणायला किंवा माफी मागायला किंवा चूक मान्य करायला तयार नसतात. त्यांना सॉरी म्हणायला कमीपणा वाटतो. त्यांना समजावून सांगा की, त्यांच्या छोट्याशा चुकीबद्दलही सॉरी म्हणायला हवं. यामुळं त्यांची प्रतिमा खराब होणार नाही तर ती सुधारेल.

सॉरी म्हणण्याची सवय लावा - अनेकदा कितीही मोठी चूक झाली तरी मुलं सॉरी म्हणायला किंवा माफी मागायला किंवा चूक मान्य करायला तयार नसतात. त्यांना सॉरी म्हणायला कमीपणा वाटतो. त्यांना समजावून सांगा की, त्यांच्या छोट्याशा चुकीबद्दलही सॉरी म्हणायला हवं. यामुळं त्यांची प्रतिमा खराब होणार नाही तर ती सुधारेल.

एका वर्षाच्या मुलाच्या वाढीमुळे आईला टेन्शन आलं आहे.

कॅनबेरा, 18 डिसेंबर : प्रत्येक आईला तिचं मूल हे तिच्या जीवापेक्षाही जास्त मौल्यवान असतो. किंबहुना तिचा जीव मुलांमध्येच अडकलेला असतो. आपलं मूल भरभर मोठं व्हावं, असं प्रत्येक आईला वाटतं. तो हेल्दी आणि फिट राहवा, यासाठी ती प्रयत्न करत असते. त्याची वाढ आणि विकास होणं तिच्यासाठी सर्वात आनंदाची बाब असते.  पण एका आईला मात्र आपल्या बाळाच्या वाढीमुळे टेन्शन आलं आहे. कारण अगदी कमी वयात तिचा मुलगा भलताच मोठा झाला आहे (1 year old kid looks Older than real age).

आपल्या वयाच्या मानाने तो खूप मोठा दिसू लागला आहे. एका महिलेचा एक वर्षांता मुलगा तब्बल पाच वर्षांच्या मुलाइतका दिसू लागला आहे (1 year old kid looks like 5 year old boy).

ऑस्ट्रेलियाच्या (Australia) सिडनीत (Sydney) राहणारी 42 वर्षांची जेड लीडरला (Jayde Leeder) गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका बाळाला जन्म दिला. त्याचं नाव सोनी. ज्यावेळी च्याचा जन्म झाला तेव्हा त्याचं वजन  4 किलो होतं. पण काही महिन्यांतच त्याचं वजन खूप वाढू लागलं. एका वर्षातच तो जवळपास 16 किलोंचा झाला आहे. तो 5 वर्षांच्या मुलाप्रमाणे दिसत असल्याचं त्याच्या आईने सांगितलं.

हे वाचा - तुमच्या बाळाचे केस विरळ झालेत का? घरच्या-घरी हे नैसर्गिक उपाय करून पहा परिणाम

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार जेव्हा जेड प्रेग्नंट होती तेव्हा तिच्या बेबी बम्पचा आकार पाहून डॉक्टरही हैराण झाले होते. बाळाला डायबेटिज होईल की काय अशी चिंता त्यांना होती. पण सुदैवाने तसं काही झालं नाही. सोनी सामान्य मुलांपेक्षा किंचित हेल्दी होता.

जेडच्या आईने सांगितलं की जेव्हा तिच्या पहिला मुलाचा जन्म झाला तेव्हा त्याचं वजनही चार किलोंच्या आसपासच होतं. त्यामुळे सोनीसुद्धा तसाच असेल असं तिला वाटत होतं.

हे वाचा - अंडं आधी की कोंबडी? अखेर या सर्वात कठीण प्रश्नाचं योग्य उत्तर सापडलंच

जेडने टिकटॉकवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तिने आपल्या मुलाची उंची आणि वजनाबाबत सांगितलं आहे. जे ऐकून नेटिझन्स हैराण झाले आहेत. जेडने सांगितलं, तिचा मुला इतका लठ्ठ आणि हेल्दी झाला आहे की त्याला लहान मुलांचे डायपर होतच नाही. जेव्हा तो 9 महिन्यांचा होता तेव्हा त्याला मुलांच्या डायपरमध्ये सर्वात मोठ्या साइझचे डायपर बसत होते. पण एक वर्षांच्या झाल्यानंतर आता त्याला तेसुद्धा छोटे पडू लागले आहेत, त्यामुळे त्याला आम्ही अडल्ट डायपर घालतो  (1 year old Child Wear Adult Diaper)

First published:

Tags: Health, Lifestyle, Parents and child, Small baby, Weight, Weight gain