Home /News /lifestyle /

अजबच! ना परफ्युम वापरत ना डिओ; तरी या महिलेच्या शरीरातून येतो सुगंध

अजबच! ना परफ्युम वापरत ना डिओ; तरी या महिलेच्या शरीरातून येतो सुगंध

आपल्या शरीराला सुगंध येत असल्याचं या महिलेलाही काही वर्षांपूर्वीच समजलं.

    हनोई, 18 डिसेंबर : अंघोळीनंतर काही कालावधीपर्यंत शरीरावर साबणाचा सुगंध राहतो. पण त्यानंतर शरीराला घाम येतो आणि मग घामाचा दुर्गंध येऊ लागतो. त्यासाठी आपण डिओडरंट किंवा परफ्युम वापरतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एका महिलेला याची गरज पडतच नाही कारण तिच्या शरीरातूनच सुगंध येतो (Woman Natural Scent). या महिलेच्या शरीराला नैसर्गिकरित्या सुगंध मिळाला आहे (Woman’s Body gives off natural perfume). व्हिओतनामच्या (Vietnam Woman Perfume Smell from Body) सोक त्रांग प्रांतात राहणारी दँड थी तुई  (Dang Thi Tuoi) दिसायला अगदी सामान्य महिला पण तिच्यातील सुपरपॉवर माहिती होताच सर्वजण हैराण झाले आहेत. ती कोणता डिओ किंवा परफ्युम वापरत नाही तरी तिच्या शरीरातून तसाच सुगंध येतो. हे वाचा - OMG! वयाच्या पहिल्या वर्षातच चिमुकला भलताच मोठा झाला; लेकाला पाहून आईही शॉक दँगलाही आपल्यातील या शक्तीबाबत काही वर्षांपूर्वीच माहिती झाली. दिवसभर काम केल्यानंतर ती आपले हातपाय धुत होती तेव्हा तिच्या शरीरातून तिला सुगंध येऊ लागला. त्यानंतर तिने आपल्या त्वचेला घासलं तेव्हा त्यातून सुगंध अधिकच येऊ लागला.  Doc La Binh Tuong या यूट्युब चॅनेलनेही दँगच्या या सुपरपॉवरची टेस्ट केली. दँगने सांगितलं की तिच्या शरीराच्या काही भागातून जास्त तर काही भागातून कमी सुगंध येतो. दिवसा त्वचेला घासल्यानंतरच सुगंध येतो. रात्रीच्या वेळी सुगंध इतका वाढतो की अगदी दूर बसलेल्या लोकांपर्यंत सुगंध पोहोचतो.  मासिक पाळीदरम्यान सुगंध कमी होतो तर पौर्णिमेला सुगंध वाढतो. हे वाचा - अंडं आधी की कोंबडी? अखेर या सर्वात कठीण प्रश्नाचं योग्य उत्तर सापडलंच दँगचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दुंग नावाच्या आणखी एका महिलेनेही तिच्या शरीरातून सुगंध येत असल्याचा दावा केला आहे. जेव्हा ती तिचं शरीर घासते तेव्हा तिला सुगंध जाणवतो. तिचीही युट्यूब चॅनेलने टेस्ट केली आणि तिचा दावा खरा ठरला. पण या दोन्ही महिलांच्या शरीरातून सुगंध कसा येतो, त्यामागील नेमकं कारण काय हे मात्र समजलेलं नाही.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Beauty tips, Lifestyle, Woman

    पुढील बातम्या