जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Shocking! आईबाबांनीच आपल्या 2 चिमुकल्यांचं 2 श्वानांशी लावून दिलं लग्न; कारणही धक्कादायक

Shocking! आईबाबांनीच आपल्या 2 चिमुकल्यांचं 2 श्वानांशी लावून दिलं लग्न; कारणही धक्कादायक

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

माणसाचं लग्न प्राण्याशी लावल्याने एकच खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ Odisha
  • Last Updated :

भुवनेश्वर, 15 एप्रिल : पूर्वी बालविवाह होत होते. आता कायद्याने हा गुन्हा आहे. पण तरी भारतातील काही ठिकाणी लहान मुलांची लग्न लावली जातात. आता तर एका प्रकरणात हद्दच झाली आहे. लहान मुलांचं चक्क श्वानां शी लग्न लावून देण्यात आलं आहे. तेसुद्धा थाटात. भारतातील एका गावातील या विचित्र लग्नामुळे खळबळ उडाली आहे. एक 11 वर्षांचा मुलगा आणि एक 7 वर्षांची मुलगी ज्यांचं लग्न श्वानांशी लावण्यात आलं आहे. मुलाचं मादी श्वानाशी आणि मुलीचं नर श्वानाशी लग्न लावलं गेलं. हे लग्न अगदी थाटात झालं आणि संपूर्ण गावाला जेवणही देण्यात आलं. ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बंदशाही या आदिवासी गावात हे अजब लग्न पार पडलं.

News18लोकमत
News18लोकमत

पीटीआयच्या वृत्तानुसार 28 वर्षीय सागर सिंहने सांगितलं की, समाजाच्या परंपरेनुसार हे दोन्ही विवाह सकाळी सात ते एक वाजेपर्यंत चालले आणि सामूहिक मेजवानी आयोजित करण्यात आली. लग्नाच्या दुसऱ्या रात्रीच नवरदेव उद्ध्वस्त; नवरीबाईच्या ‘त्या’ कृत्यामुळे कुटुंब हादरलं हे लग्न म्हणजे या गावातील हो आदिवासी समाजाच्या लोकांची अंधश्रद्धा. मुलांचा पहिला दात वरच्या जबड्यात आल्यावर या मुलांच्या पालकांनी त्यांच्या लग्नासाठी कुटुंबाचा शोध गेला. आपल्या मुलांच्या आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, अशी भीती त्यांना असते. “अशा विवाहामुळे दुष्ट आत्म्यांपासून मुक्ती मिळते असा त्यांचा समज आहे. लग्नानंतर हा दुष्ट आत्मा कुत्र्यांमध्ये शिरतो अशी समाजाची धारणा आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नसला तरी ही अंधश्रद्धा पिढ्यानपिढ्या सुरू आहे” असं सागर यांनी सांगितलं. Mehndi Video : लग्नाची मेहंदी पाहून लोक करत आहेत घटस्फोटाची चर्चा; नवरीबाईने हातावर असं काढलंय तरी काय? लग्नाची बरीच विचित्र प्रकरण आहेत. कुणी स्वतःशी लग्न केलं, तर कुणी बाहुल्यांशी, दोन प्राणी आणि दोन पक्ष्यांचीही एकमेकांसोबत लग्न लावून दिल्याची प्रकरणं आहेत. पण चिमुकल्यांचं असं प्राण्यांशी लग्न लावून दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात