जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Mehndi Video : लग्नाची मेहंदी पाहून लोक करत आहेत घटस्फोटाची चर्चा; नवरीबाईने हातावर असं काढलंय तरी काय?

Mehndi Video : लग्नाची मेहंदी पाहून लोक करत आहेत घटस्फोटाची चर्चा; नवरीबाईने हातावर असं काढलंय तरी काय?

फोटो सौजन्य - Canva

फोटो सौजन्य - Canva

ब्राइडल मेहंदीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 08 एप्रिल : लग्ना त हळदीसह मेहंदीलाही खूप महत्त्व आहे. वधूच्या हातावरील मेहंदी खूप खास असते. सामान्यपणे नवरीच्या हातावरील मेहंदीत तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव लिहिलं जातं आणि नंतर गंमत म्हणून नवरदेवाला त्या मेंहदीतील नाव शोधायलाही लावलं जातं. पण आता ब्राइडल मेहंदीतही हटके डिझाइन पाहायला मिळतात. नवरदेवाच्यान नावासह या मेहंदीत बरंच काही असतं. अशाच एका लग्नाच्या मेहंदीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक घटस्फोटाची चर्चा करत आहेत. नवरीबाईने हातावर अशी मेहंदी काढली आहे, की पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. लग्नाची मेहंदी असताना लोक घटस्फोटाचा विषय काढत आहेत. नवरीने आपल्या हातावर मेहंदीत नवरदेवाचं नाव तर लिहिलं नाहीच. पण तिने असं काही लिहिलं आहे, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. काहीतरी हटके करण्याच्या नादात नवरीने अशी मेहंदी काढली, की व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

mehandi_by_anku नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्राइडल मेहंदीचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. थाटामाटात झालं लग्न, पण शेवट धक्कादायक; टॉयलेटमध्ये अशा अवस्थेत सापडली नवरी; VIDEO VIRAL व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नवरीच्या हातावर मेहंदी काढली जात आहे. या मेहंदीत नवरीने काय लिहिलं आहे ते तुम्ही नीट वाचा. मेहंदीवर नवरीने नवरदेवासोबत सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर भेटीची, त्यानंतर प्रत्यक्षात पहिल्या भेटीची, प्रपोजलची आणि लग्नाची तारीख लिहिली आहे.  दोघंही 5 डिसेंबर 2021 रोजी इन्स्टाग्रामवर भेटले होते. 19 जानेवारी 2022 रोजी त्याने तिला प्रपोज केलं. 25 एप्रिल 2022 रोजी त्यांची प्रत्यक्ष पहिली भेट झाली. 31 जानेवारी 2023 रोजी त्यांचं लग्न निश्चित झालं. VIDEO - बिच्चारा जावई! तोऱ्यात सासरी आला, पण झाला असा पाहुणचार की पुन्हा फिरकणारही नाही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही युझर्सनी तिला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तिचं अभिनंदन दिलं आहे. तर काहींनी तिच्या या तारखा पाहून इतकी काय घाई होती, असा सवालही केला आहे. एका युझरने तर आता घटस्फोटाची तारीखही लिहायची की, असं म्हटलं आहे.

जाहिरात

तुम्हाला लग्नातील मेहंदीची अशी डिझाइन पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात