जाहिरात
मराठी बातम्या / Viral / लग्नाच्या दुसऱ्या रात्रीच नवरदेव उद्ध्वस्त; नवरीबाईच्या 'त्या' कृत्यामुळे कुटुंब हादरलं

लग्नाच्या दुसऱ्या रात्रीच नवरदेव उद्ध्वस्त; नवरीबाईच्या 'त्या' कृत्यामुळे कुटुंब हादरलं

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

लग्नाच्या दुसऱ्या रात्री नवरीबाईने जे केलं त्यामुळे नवरदेवासह संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ, 09 एप्रिल : वयाची चाळीशी ओलांडली तरी त्याचं लग्न ठरत नव्हतं. अखेर त्याला नवरी मिळाली. थाटात लग्न करून वाजतगाजत त्याने तिला घरी आणलं. पण लग्नाच्या दुसऱ्याच रात्री नवरीने नवरदेवाला उद्ध्वस्त करून टाकलं. लग्नानंतर दुसऱ्या रात्री नवरीबाईने असं कृत्य केलं की, नवरदेवासह संपूर्ण कुटुंब हादरलं. सर्वांना जबर धक्का बसला. उत्तर प्रदेशातील लग्नाचं हे प्रकरण चर्चेत आलं आहे. मेरठच्या रोहटा गावातील 42 वर्षांचा आशिष, इतकं वय झालं तरी त्याचं लग्न ठरत नव्हतं. त्याला लग्नासाठी मुलगीच मिळत नव्हते. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला खूप चिंता होती. अखेर त्यांच्या एका नातेवाईकाने त्यांना लग्न ठरवण्यासाठी हल्द्वानीतील एका मध्यस्थीचं नाव सांगितलं. या मध्यस्थीने आशिष आणि त्याच्या कुटुंबासाठी सीमा नावाच्या मुलीचं स्थळ आणलं. ती हल्द्वानीत राहणारीच होती.

News18लोकमत
News18लोकमत

आशिष आणि त्याच्या घरच्यांना सीमा आवडली आणि त्यांचं लग्न ठरलं. आशिष-सीमाच्या लग्नाची तारीख ठरली. Mehndi Video : लग्नाची मेहंदी पाहून लोक करत आहेत घटस्फोटाची चर्चा; नवरीबाईने हातावर असं काढलंय तरी काय? अगदी रितीरिवाजानुसार 5 एप्रिलला हलद्वानीत लग्न पार पडलं. वाजतगाजत वरात रोहटा गावात आली.  मुलाचं लग्न झाल्याने कुटुंब, नातेवाईक आनंदात होते. घरात आनंदी वातावरण होतं. माहेर सोडून सासरी आलेली नवरीबाईही खूश होती. पण तिच्या या आनंदामागे वेगळाच चेहरा लपलेला होता. सीमा लग्नाची एक रात्र त्या घरात राहिली आणि लग्नाच्या दुसऱ्याच रात्री तिने नको तो प्रताप केला. नवी नवरी लग्नाच्या दुसऱ्याच रात्री अचानक गायब झाली. सर्वजण तिला शोधू लागले पण ती कुठेच सापडली नाही. तेव्हा तिचा खरा चेहरा समोर आला. ती कुणासोबत तरी बाईकवर दिसल्याचं समजलं. तेव्हा आशिष आणि त्याच्या कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली. नवरी फरार झाल्याची पोलिसात तत्कार नोंदवण्यात आली. घरातील दागिने, पैसे घेऊन ती फरार झाली. VIDEO - नवरदेव वरात घेऊन दारात अन् धावत बाल्कनीत गेली नवरी; पुढे असं काही घडलं की… आज तकच्या वृत्तानुसार पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणाचा तपास सुरु आहे. सत्य समोर येताच योग्य ती कारवाई केली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात