नवी दिल्ली 04 जानेवारी : सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्धी मिळण्यासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. मात्र प्रसिद्ध होण्याच्या नादात काही लोक असं काहीतरी करतात की त्यांचा स्वतःचा जीवच धोक्यात येतो. विशेषतः एखादा स्टंट व्हिडिओ (Stunt Video) पाहताना तुम्हाला ही बाब प्रकर्षाने जाणवेल. सध्या सोशल मीडियावर असाच एक स्टंट व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुरुवातीला हा व्हिडिओ पाहून तुम्हाला या तरुणांची दया येईल. मात्र, नंतर यांच्यासोबत जे घडलं, ते योग्यच होतं, असंही वाटेल. हा व्हिडिओ हैराण करणारा आहे.
अस्वलाची शिकार करायला गेला वाघ; विचारही केला नसेल असा झाला शेवट; पाहा VIDEO
तुम्ही सोशल मीडियावर सक्रीय असाल तर आजपर्यंत अनेक स्टंट व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेकदा स्टंट करताना लोकांचे जीवही जातात. याच कारणामुळे प्रोफेशनल व्यक्तींनीच स्टंट करावे, असा सल्ला दिला जातो. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दोन तरुण दुचाकीवरुन प्रवास करत असल्याचं दिसतं. दोघंही दुचाकीवर फिरण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत. पुढे तुम्ही पाहू शकता की एक तरुण दुचाकी चालवत असतानाच मागे बसलेला युवक त्याच्या खांद्यावर जाऊन बसतो. व्हिडिओ अधिक मजेशीर तेव्हा होता जेव्हा पुढच्याच काही वेळात हे दोघंही जमिनीवर बसून माफी मागताना दिसतात.
हा व्हिडिओ ट्विटरवर Rupin Sharma यांनी शेअर केला आहे. व्हिडिओ 3 जानेवारीला शेअर केला गेला असून नेटकऱ्यांच्या भरपूर पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तर अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी कमेंट करत म्हटलं, की हे लोक स्वतःचाच जीव धोक्यात आणत आहेत. तर काहींनी म्हटलं की या गोष्टी प्रोफेशनल लोकांनीच कराव्या. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, हे दोघं, नायकापासून खलनायकापर्यंतचा प्रवास.
कोंबड्याचा थाट! पाहुण्यांच्या उपस्थितीत कापला केक; अनोख्या वाढदिवासाचा VIDEO
एका यूजरने या व्हिडिओवर कमेंट करत जय-वीरू असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने लिहिलं, यांचा चांगला पाहुणचार व्हायला हवा. तिसऱ्या यूजरने लिहिलं, पुढच्या वेळी जरा काळजी घ्या. याशिवायही इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.