मुंबई : क्रिकेट हा भारतीयांच्या सर्वात जवळचा विषय आहे. इथे लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच क्रिकेटचं वेड आहे. भारतात गल्ली-गल्लीत तुम्हाला लोक क्रिकेट खेळताना दिसतील. पण तसे पाहाता क्रिकेट हा काही भारताचा नॅशनल खेळ नाही. ब्रिटीश हा खेळ भारतात घेऊन आले. पण आता हा खेळ भारतीयांच्या जवळचा झाला आहे. भारतीयांना क्रिकेटचे नियम अगदी तोंडपाठ झाले आहेत. सिक्स, फोर, वाईड, आऊट, एलबीडब्लू, फ्री हिट या सारखे असंख्य शब्द लोकांना तोंडात बसले आहेत. पण असं असलं तरी भारतीयांना क्रिकेटबद्दल एक गोष्ट नक्कीच माहित नसेल. ती म्हणजे क्रिकेटमधील पहिला सिक्स कोणी मारला? Video Viral: रस्त्यावर क्रिकेट खेळत होते तरुण, अचानक भरधाव बाईक आली आणि… करा थोडा विचार करा, आठवा कुठे हे नाव वाचलंय का? उत्तर आठवत नसेल तरी काळजी करु नका आम्ही तुम्हाला त्यासाठी मदत करु. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात क्रिकेट खेळले जात असले तरी प्रेक्षक केवळ आनंद घेण्यासाठीच स्टेडियममध्ये पोहोचतात. जेव्हा फलंदाज एखाद्या गोलंदाजाची धुलाई करतो आणि घाईघाईने चौकार आणि षटकार मारतो तेव्हा स्टेडियममधील गोंगाट खूपच वाढतो. जागतिक क्रिकेटमध्ये पहिला षटकार ठोकणाऱ्या या खेळाडूची ही खास कामगिरी ऑस्ट्रेलियन दिग्गजांच्या नावावर नोंदली गेली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर जो डार्लिंगने (Joe Darling) हा पराक्रम सर्वप्रथम केला आहे. डार्लिंगने 1898 मध्ये अॅडलेड ओव्हलमध्ये ही कामगिरी केली होती.
तेव्हा सिक्स किंवा षटकार मारण्याचे नियम वेगळे होते. वास्तविक, आजच्या प्रमाणे सीमारेषेबाहेर चेंडू गेला की 6 धावा मिळतात. पण तेव्हा असं व्हायचं नाही, तेव्हा सीमारेषेबाहेर चेंडू गेला की खात्यात 5 धावा यायच्या आणि जर सिक्स हवा असेल तर चेंडू स्टेडियमपर्यंत पोहोचवावा लागायचा.
चेंडू स्टेडियमवर पोहोचल्यावर फलंदाजाच्या खात्यात 6 धावा जमा होतात. तेव्हा डार्लिंगनेही त्याचा चेंडू स्टोडियमपर्यंत पोहोचवला आणि सर्वात पहिला सिक्स त्याच्या नावावर नोंदवला गेला. यासाठी फलंदाजाला बरीच मेहनत घ्यावी लागली. हा पराक्रम डार्लिंगने 14 नोव्हेंबर 1898 रोजी पूर्ण केला. त्याने अॅडलेड ओव्हलवर इंग्लंडविरुद्ध जोरदार फटकेबाजी केली.