मेरठ, 1 नोव्हेंबर : दैंनदिन जीवनात आपण अनेकदा सुनांवर अन्याय-अत्याचाराच्या घटनांविषयी ऐकतो, वाचतो. मात्र मेरठमध्ये मोदीपुरममध्ये एका घरजावयावर अत्याचार केल्याचं वृत्त समोर आलं आहे. सांगितलं जात आहे की, तरुणाला त्याची पत्नी आणि सासूने काठीने मारहाण (Husband beaten) केली. त्याच्याकडून एकच चूक झाली ती म्हणते त्याने पत्नी आणि सासूचे कपडे धुतले नव्हते.
स्वयंपाक करताना त्याच्याकडून भाजीत मीठ जास्त पडलं होतं. कसं बसं करून तो पत्नी आणि सासूच्या तावडीतून सुटका करीत पोलीस स्टेशनला गेला आणि तेथे तक्रार दाखल केली. पीडित तरुणाने दोघांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. (wife and mother in law beat son in law for not cooking properly)
काय आहे प्रकरण?
गाजियाबादमधील साहिबाबाद निवासी तरुणाचं लग्न कंकरखेडामधील एका कॉलनीतील तरुणीसोबत झालं होतं. तरुणीच्या माहेरी तिच्या आई-वडिलांशिवाय दुसरं कोणी नव्हतं. त्यामुळे लग्नानंतर मुलगा मुलीच्या माहेरी राहणार असल्याची अट ठेवण्यात आली. अटीनुसार, तरुण लग्नाच्या चार महिन्यानंतर आपल्या सासरी राहू लागला. तो गाजियाबादमधील कंपनीत नोकरी करतो आणि दररोज कंकरखेडाहून येत-जात असतो. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाकडून त्याची पत्नी घरातील काम देखील करवत होती. मात्र तरुण याचा विरोध करीत असे. यावरुन पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला होता.
हे ही वाचा-लग्नमंडपातच चढला नवरीचा पारा; पाहताच घाबरून नवरदेवानं केलं असं काही की.., VIDEO
चविष्ट स्वयंपाक न केल्यानं घरजावयाला मारहाण..
शनिवारी पत्नीच्या ऑर्डरनंतर घरजावयाने भाजी-पोळी आणि वरण-भात केला. कोशिंबीरही केली आणि पत्नी, सासूचं ताट सजवून त्यांना जेवायला दिलं. स्वयंपाक चविष्ठ झाला नसल्याचं सांगून दोघेही त्याला बडबड करू लागले. घरजावयाला विरोध केला तर त्याला मारहाण करण्यात आली. शेजारच्यांनी कसंबसं करून घरजावयाला सासू आणि पत्नीच्या तावडीतून सोडवलं.
घरजावयाने पोलिसात केली तक्रार..
यानंतर तरुण पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या. त्याने पत्नी आणि सासूविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यावर पोलिसांनी सांगितलं की, तरुणाकडून तक्रार करण्यात आली आहे. पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहे. दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uttar pardesh, Wife and husband