उटावा, 05 फेब्रुवारी : बर्थडे आला की कुणीतरी आपल्याला गिफ्ट द्यावं, सरप्राइझ द्यावं, आपला बर्थडे खास असावा असं अनेकांना वाटतं. काही जण तर आपल्या बर्थडेसाठी इतके उत्साही असतात की स्वतःचा बर्थडे स्वतःच खास बनवण्यासाठी प्रयत्न करतात. तुम्हीही तुमच्या वाढदिवसाला काही ना काही खास करत असाल. अशाच एका तरुणीने तिच्या वाढदिवसाला खास करण्यासाठी असं काम केलं की ती मालामाल झाली. वयाच्या अठराव्या वर्षातच ही तरुणी अब्जाधीश बनली आहे. कॅनडात राहणारी ज्युलिअट लॅमॉर. नुकतीच अठऱा वर्षांची झाली आहे. तिने आपला वाढदिवश खास बनववावा म्हणून तिच्या आजोबांनी तिला एक सल्ला दिला. तिने आजोबांचं ऐकलं आणि तिनं ते कामही केलं. या कामात तिला तिच्या वडिलांनीही मदत केली. त्यानंतर तिचं नशीबच फळफळलं. तिने तब्बल 3 अब्ज रुपये जिंकले आहेत. आता तरुणीने वाढदिवशी नेमकं केलं तरी काय की ती एकाच फटक्यात तिला इतके पैसे मिळाले, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. हे वाचा - बिस्कीट घेताना महिलेनं केलं असं काही की पालटलं नशीब; बनली करोडपती ज्युलिअटच्या आजोबांनी तिला तिचा बर्थडे अविस्मरणीय बनवण्यासाठी लॉटरी तिकीट खरेदी करण्याचा सल्ला दिला. ज्युलिअटने याआधी कधीच लॉटरी तिकीट खरेदी केलं नव्हतं. पण तरी आजोबांनी सांगितल्यानंतर त्यांचं मन राखण्यासाठी म्हणून ती लॉटरी खरेदी करायला गेली. पण लॉटरी तिकीट खरेदी करताना तिचा गोंधळच उडाला. तेव्हा तिने आपल्या वडिलांना फोन केला. तिच्या वडिलांनी तिला LOTTO 6-49 क्विक पिक घ्यायला सांगितलं. तिने तेच केलं आणि ते लॉटरी तिकीट तिला लागलं. तिच्या वाढदिवशी तिच्या आयुष्यातील पहिलं लॉटरी तिकीट आणि ते ती जिंकलीसुद्धा. डेली मेलच्या रिपोर्टनुसार 19 वर्षांच्या ज्युलिएटने 48 मिलियन कनेडियन डॉलर म्हणजे जवळपास 2.9 अब्ज रुपये जिंकले. यासोबतच कॅनडात सर्वात कमी वयात सर्वात मोठी लॉटरी जिंकण्याचा रेकॉर्डही तिने आपल्या नावे केला आहे. हे वाचा - याला म्हणतात नशीब! बायकोच्या पर्समधील फक्त 160 रुपयांच्या वस्तूने नवरा बनला करोडपती
ती म्हणाली, “आज मी अब्जाधीश आहे. मला विश्वासच बसत नाही आहे की मी लॉटरीत इतके पैसे जिंकले आहे. माझी पहिली लॉटरी तिकीटवर गोल्ड बॉल जॅकपॉट माझ्या नावावर केलं आहे”
तुमच्या वाढदिवसाचा असा काही किस्सा असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.