वॉशिंग्टन, 22 जानेवारी : आपण श्रीमंत असावं, आपल्याकडे बक्कळ पैसा असावा असं कुणाला वाटणार नाही. पण पैसे कमावण्यासाठी तितकीच मेहनतही करावी लागते. एका रात्रीत कुणी श्रीमंत होत नाही. पण काही वेळा नशीब अशी काही साथ देतं अशक्य गोष्टही शक्य होतं. अशीच लकी ठरली ती एक महिला. जी बिस्कीट खरेदी करायला गेली. त्यावेळी तिने एक छोटंसं काम केलं आणि तिचं नशीबच पालटलं. काही क्षणात ती करोडपती झाली.
अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये राहणारी 51 वर्षांची एमिलिया एस्ट्स एका झटक्यात 16 कोटी रुपयांची मालकीण झाली. खरंतर एमिलिया दुकानात बिस्कीट खरेदी करण्यासाठी गेली होती. पण यानंतर आपलं नशीब पालटणार आहे, याचा विचार तिने स्वप्नातही केला नव्हता. तिने आपल्या मनाचा आवाज ऐकला आणि तिला तिच्या नशीबानेही तिला साथ दिली. बिस्कीट खरेदी करायला गेलेल्या एमिलियाने आपलं नशीब आजमवण्याचाही विचार केला. म्हणून तिने बिस्किटासह 1600 रुपयांचं एक लॉटरी स्क्रॅचकार्डही खरेदी केलं.
हे वाचा - याला म्हणतात नशीब! बायकोच्या पर्समधील फक्त 160 रुपयांच्या वस्तूने नवरा बनला करोडपती
एमिलाया म्हणाली, दुकानात गेल्यानंतर मला लॉटरीचं तिकीट खरेदी करायला हवं असं वाटत होतं. मी माझ्या मनाचा आवाज ऐकला आणि तिकीट खरेदीही केलं. या तिकीटाने माझं नशीब चमकवलं.
एमिलियाने खरेदी केलेलं कार्ड स्क्रॅच केलं आणि लॉटरीचा नंबर आपल्या कार्डच्या नंबरशी मॅच केला. त्यानंतर तिने जे पाहिलं त्यावर ते पाहून तिला विश्वासच बसला नाही. तिला लॉटरी लागली होती. तिच्या हाती जॅकपॉट लागला होता. नॉर्थ कॅरोलिनाच्या एज्युकेशन लॉटरीच्या मते, एमिलया नेहमीप्रमाणे दुकानात बिस्कीट घ्यायला आली होती. पण हा दिवस तिच्यासाठी खास ठरला. तिने 1600 रुपयांचं लॉटरीचं एक तिकीट खरेदी केलं आणि ती जवळपास 16 कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकली. हे वाचा - काय सांगता! अवघ्या 6 तासात तरुणीने कमावले 8 कोटी रुपये, नेमकं काय करते? द मिररच्या वृत्तानुसार 16 कोटी रुपये जिंकलेल्या एमिलियाला सर्व पैसे मिळाले नाहीत. तिला दोन पर्याय देण्यात आले. एक तर सलग 20 वर्षे दरवर्षी 80 लाख रुपये घेऊ शकत होती किंवा एकाच वेळी 9 कोटी रुपये. एमिलियाने दुसरा पर्याय निवडा. तिने एकाच वेळी 9 कोटी रुपये घेण्याचं ठरवलं. पण तरी ती करोडपती आहेच की.