मराठी बातम्या /बातम्या /Viral /एका क्षणात गायब झाले 17 लाख फॉलोअर्स! आईच्या या कृतीमुळे 14 वर्षीय Insta Influencer ला बसला मोठा झटका

एका क्षणात गायब झाले 17 लाख फॉलोअर्स! आईच्या या कृतीमुळे 14 वर्षीय Insta Influencer ला बसला मोठा झटका

एका 14 वर्षीय मुलीचं लाखो फॉलोवर्स असलेलं सोशल मीडिया अकाउंट तिच्या आईने डिलीट केलं आहे. अशाप्रकारे अकाउंट डिलीट केल्याने, तसंच यामागील कारणामुळे  त्याची मोठी चर्चा आहे.

एका 14 वर्षीय मुलीचं लाखो फॉलोवर्स असलेलं सोशल मीडिया अकाउंट तिच्या आईने डिलीट केलं आहे. अशाप्रकारे अकाउंट डिलीट केल्याने, तसंच यामागील कारणामुळे त्याची मोठी चर्चा आहे.

एका 14 वर्षीय मुलीचं लाखो फॉलोवर्स असलेलं सोशल मीडिया अकाउंट तिच्या आईने डिलीट केलं आहे. अशाप्रकारे अकाउंट डिलीट केल्याने, तसंच यामागील कारणामुळे त्याची मोठी चर्चा आहे.

ब्राझील, 5 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) आपले अनेक फॉलोवर्स असावेत अशी अनेकांची इच्छा असते. फॉलोवर्स वाढवण्यासाठी अनेक ट्रिकही वापरल्या जातात. पण एखाद्याने तुमचं लाखो फॉलोवर्स असलेलं सोशल मीडिया अकाउंट अचानक डिलीट केलं तर? अशीच काहीशी घटना एका 14 वर्षीय मुलीसह घडली आहे. या मुलीच्या फॉलोवर्सची संख्या मोठी होती, पण अचानक तिच्या आईनेच तिचं इतक्या मोठ्या संख्येत फॉलोवर्स असलेलं अकाउंट डिलीट केलं आहे. अशाप्रकारे अकाउंट डिलीट केल्याने, तसंच यामागील कारणामुळे  त्याची मोठी चर्चा आहे.

ब्राझीलमध्ये राहणाऱ्या 14 वर्षीय वेलेंटिना (Valentina) नावाच्या मुलीचे इन्स्टाग्राम (Instagram) आणि टिकटॉकवर (TikTok) 1.7 मिलियन म्हणजेच तब्बल 17 लाख फॉलोवर्स होते. पण तिच्या आईने कठोर भूमिका घेत, तिचे दोन्ही अकाउंट डिलीट केले.

डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, वेलेंटिनाची आई फर्नांडा रोचा कनेर (Fernanda Rocha Kanner) यांनी टिकटॉक आणि इन्स्टाग्राम हानीकारक असल्याचं सांगत मुलीची सोशल मीडिया अकाउंट्स डिलीट केली. लोकांनी दिलेल्या फीडबॅकच्या आधारे, ऑनलाईन फीडबॅकच्या माध्यमातून आपल्या मुलीने स्वत:ला तसंच समजावं, स्वत:सोबत इतरांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या आधारे न्याय करावा हे तिच्या आईला पसंत नसल्याने, त्यांनी मुलीचं इतक्या मोठ्या संख्येत फॉलोवर्स असणारं अकाउंट डिलीट केलं. ऑनलाईन फीडबॅकनुसार स्वत:ला तसं ठेवणं ही बाब तरुणांमध्ये हानीकारक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. इतकंच नाही, तर टिकटॉक आणि इन्स्टाग्राम हे मोठ्या वयोगटातील लोकांसाठीही धोकादायक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हा पठ्ठ्या अडकला Ex-Girlfriend च्या खिडकीत, तिच्या घरात घुसण्याचा होता विचार पण.

आपल्या मुलीच्या अकाउंटवर तिचे इतके 1.7 मिलियन फॉलोवर्स आहेत. पण या सगळ्यांना ती ओळखतदेखील नाही. त्यांना तिने कधी पाहिलेलंही नाही, ही बाब अतिशय धोकादायक आहे. अशाप्रकारे सोशल मीडियावर स्वत:ला हरवून टाकणं, ही चांगलं नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याच कारणासाठी त्यांनी मुलीचं अकाउंट डिलीट केल्याने, त्यांच्या या निर्णयाचं अनेक महिलांनी कौतुक केलं आहे. तर तरुणांनी मात्र ही हुकूमशाही असल्याचं म्हटलं आहे.

अरे बापरे! नवरीला किस करताच बेशुद्ध झाला नवरा, धाडकन स्टेजवर कोसळला; पाहा VIDEO

वेलेंटिनाच्या आईने तिचं टिकटॉक आणि इन्स्टाग्राम अकाउंट अशाप्रकारे डिलीट केल्याने ती नाराज असून आता पुन्हा कधी सोशल मीडियावर येईन, याबाबत काहीही ठरवलं नसल्याची प्रतिक्रिया तिने दिली आहे.

First published:

Tags: Instagram, Social media