मुंबई, 04 ऑगस्ट : लग्नाचे (Wedding) बरेच व्हिडीओ (Wedding video) तुम्ही पाहिले असतील पण आता तुम्हाला आम्ही असा व्हिडीओ दाखवणार आहोत जो पाहून तुम्ही सुरुवातीला हैराण (Shocking Wedding video ) व्हाल. याचं कारण म्हणजे लग्नात नवरा (Groom video) चक्क बेशुद्ध झाला आहे आणि याचं कारण म्हणजे किस. नवरीला किस करताच नवऱ्याला चक्कर आली आणि नवऱ्याने लग्नातच नवरीला (Bride video) किस केलं आणि त्यानंतर तो चक्क बेशुद्ध झाला (Groom fainted after kissed bride).
धर्म, समाजानुसार लग्नाच्या विधी-परंपराही वेगवेगळ्या असतात. ख्रिश्चन धर्मात लग्नात नवरा-नवरी एकमेकांना किस करतात. असं किस केल्यानंतर नवरा बेशुद्ध झाला आहे. नेमकं काय झालं ते तुम्ही व्हिडीओतच पाहा.
View this post on Instagram
चर्चमध्ये हे लग्न होत आहे. नवरा-नवरी एकमेकांसमोर उभे आहे. नवरी सुंदर अशा वेडिंग गाऊनमध्ये दिसते आहे. तर नवरा काळ्या सुटात दिसतो आहे. दोघंही एमेकांना किस करतात. त्यानंतर नवरा जसा उभा आहे, तसाच धाडकन स्टेजवर कोसळतो. नवरीला किस केल्यानंतर तो बेशुद्धच होतो. स्टेजवर पडणाऱ्या नवऱ्याला त्याच्या मागे असलेले मित्र सावरतात.
हे वाचा - 'बेटा बेटा ना कर, अब तेरा...', गोड गोड गात सुनेने सासूलाच दिली धमकी; पाहा VIDEO
नवरा बेशुद्ध झालेला असतानाही नवरी हसताना दिसते आहे. यावरून हा व्हिडीओ मजेशीर व्हिडीओ असल्याचं दिसून येतं. म्हणजे नवरा खरंच बेशुद्ध झाला नाही तर तो मजा करतो आहे. जसं तो नवरीला किस करतो तसं बेशुद्ध होण्याचं आणि स्टेजवर पडण्याचं नाटक करतो. नवरदेव असंकाही तरी करणार आहे, याची कल्पना नवरीलाही नसते. पण खरं काय ते समजताच ती आणि तिच्या मागे असलेल्या मैत्रिणीसुद्धा हसू लागतात.
हे वाचा - स्टेजवरच नवरीनं केलं असं काही की लाजला नवरदेव; कपलचा Romantic Video व्हायरल
लग्न कोणतंही असतो त्यात मजामस्ती ही असतेच. लग्नात ड्रामा नाही हे शक्यच नाही आणि हा ड्रामा तर नेटिझन्सना चांगलाच आवडतो आहे. यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Funny video, Viral, Viral videos, Wedding, Wedding video