जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हा पठ्ठ्या अडकला Ex-Girlfriend च्या खिडकीत, तिच्या घरात घुसण्याचा होता विचार पण...

हा पठ्ठ्या अडकला Ex-Girlfriend च्या खिडकीत, तिच्या घरात घुसण्याचा होता विचार पण...

फोटो सौजन्य - द सन

फोटो सौजन्य - द सन

एक तरुण दारू प्यायला आणि आपल्या आधीच्या गर्लफ्रेंडच्या घरात खिडकीतून घुसण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा तो खिडकीतच अडकला. कंबरेच्या वरचा भाग घराच्या आत आणि त्या खालचा भाग बाहेर अशा पद्धतीने तो काही तास लटकून होता.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    कीव : दारुच्या नशेत माणूस काय करेल याचं त्याला भान राहत नाही आणि मग जगासमोर आश्चर्यचकित करणाऱ्या घटना येत राहतात. असे व्हिडीओ (Video) एखादी अनोळखी व्यक्ती तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करते आणि मग जगाला त्या वेडेपणाचं दर्शन घडतं. युक्रेनमधील (Ukraine) Kherson Region या भागात अशीच एक घटना घडली आहे. एक तरुण दारू प्यायला आणि आपल्या आधीच्या गर्लफ्रेंडच्या (Ex-Girlfriend) घरात खिडकीतून घुसण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा तो खिडकीतच (Window) अडकला. कंबरेच्या वरचा भाग घराच्या आत आणि त्या खालचा भाग बाहेर अशा पद्धतीने तो काही तास लटकून होता. शेवटी पोलिसांनी येऊन त्याची सुटका केली. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्याला फार दुखापत झाली नसल्याचं लक्षात आलं, पण जर तो आणखी काही काळ तशा अवस्थेत राहिला असता तर श्वास गुदमरून त्याचा मृत्यू होण्याची शक्यता होती असं डॉक्टरांनी सांगितलं. ‘द सन’ने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना युक्रेनमधील (Ukraine) आहे. हा तरुण त्याच्या एक्स गर्लफ्रेंडवर शरीर संबंधांसाठी दबाब टाकत होता. पण तिने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर त्याने दारूच्या नशेत तिच्या घराच्या मागच्या बाजूने घरात शिरण्याचा प्रयत्न केला. तो खिडकीत चढला इतक्यात खिडकीची दारं लागली आणि तो त्या कचाट्यात अडकला. दारुच्या नशेत (Drunken)असल्यामुळे त्याला स्वत: ला सोडवता आलं नाही. त्याने प्रयत्न केले पण तो तिथेच अडकून पडला.

    खेळता खेळता कुत्रीनं गिळली कुकरची शिटी, पुढे त्याचं झालं असं की…

    जेव्हा हा मित्र घरात घुसताना अडकून पडता तेव्हा त्याची गर्लफ्रेंड घरातच होती. तिने ते पाहिलं आणि पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी खूप प्रयत्न करून त्याला कसंबसं बाहेर काढलं. खिडकीतून त्याला बाहेर काढायला खूप कष्ट घ्यावे लागले. तो नशेत बेशुद्ध (Unconcious) झाला असल्याने त्याला श्वासही घेता येत नव्हता असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी (Police) आरोपीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

    Shocking! तरुणीचं भलतंच डेअरिंग, चक्क सापालाच केलं किस; Video पाहूनच हादराल

    याबाबत त्याची आधीची गर्लफ्रेंड म्हणाली, ‘मी याच्यासोबतचं माझं नातं कधीच तोडलं आहे. तरीही तो सतत मला त्रास देत असतो. त्यामुळे तो चोरून माझ्या घरात शिरण्याचा प्रयत्न करत होता.’डॉक्टरांनी त्याची अवस्था पाहून, जर आणखी थोडा वेळ तो अशा अवस्थेत राहिला असता तर श्वास गुदमरून त्याचा जीवही गेला असल्याचं सांगितलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात