Home /News /viral /

OMG! एका दुचाकीवर तब्बल 13 जणांनी केला प्रवास; VIDEO पाहून चक्रावून जाल

OMG! एका दुचाकीवर तब्बल 13 जणांनी केला प्रवास; VIDEO पाहून चक्रावून जाल

यात एका व्यक्तीनं तब्बल 12 जणांना दुचाकीवर बसवलं असून हे सर्व अतिशय धोकादायक पद्धतीनं प्रवास करत आहेत. व्हिडिओमध्ये दिसतं, की गाडीवर प्रवास करणारे सर्वजण बचपन का प्यार हे गाणं गात आहेत.

  नवी दिल्ली 13 सप्टेंबर : इंटरनेटच्या दुनियेत दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होताना दिसतात. हे व्हिडिओ नेटकऱ्यांचं भरपूर मनोरंजन करतात. मात्र, अनेकदा प्रसिद्ध मिळवण्यासाठी लोक असं काही करतात जे पाहून सगळेच हैराण होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Video on Social Media) होत आहे. यात एका व्यक्तीनं तब्बल 12 जणांना दुचाकीवर बसवलं असून हे सर्व अतिशय धोकादायक पद्धतीनं प्रवास करत आहेत. व्हिडिओमध्ये दिसतं, की गाडीवर प्रवास करणारे सर्वजण बचपन का प्यार हे गाणं गात आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. अश्लील वेबसाईटवर पत्नीचं प्रोफाईल पाहून हादरला पती; या गोष्टीमुळे फुटलं बिंग व्हि़डिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका व्यक्तीनं आपल्या दुचाकीवर भरपूर लहान मुलं बसवली आहेत. तब्बल 13 जण या गाडीवरुन प्रवास करत आहेत. या व्यक्तीनं दोन लहान मुलांना गाडीच्या पुढच्या बाजूच्या मडगार्डवर बसवलं आहे. पाच मुलांना पेट्रोलच्या टाकीवर बसवलं आहे. एक मुलगा या व्यक्तीच्या खांद्यावर आहे तर चार मुलं मागच्या बाजूला बसलेली आहेत.
  पतीसोबत संबंध ठेवणाऱ्या बहिणीची महिलेनं ऑफिसमध्येच केली धुलाई; Shocking Video या व्हिडिओला सोशल मीडियावर भरपूर पसंती मिळत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, की याला पकडून भरपूर मारायला हवं. लहान मुलांच्या आयुष्यासोबत खेळत आहे. तर, दुसऱ्या एका यूजरनंही लिहिलं, की स्टंटच्या नादात मुलांच्या आयुष्यासोबत खेळत आहे. एकानं लिहिलं, की यमराजला तरी घाबर. याशिवाय इतरही अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर giedde नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. या व्हिडिओला मजेशीर कॅप्शनही देण्यात आलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Funny video, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या