'दिमाग खा गई...!' Alexa बरोबर झालं दिलजीत दोसांझचं असं भांडण, पाहा VIDEO

'दिमाग खा गई...!' Alexa बरोबर झालं दिलजीत दोसांझचं असं भांडण, पाहा VIDEO

अभिनेता दिलजीत दोसांझचे मजेदार व्हिडीओ, मजेदार कमेंट्स नेहमी नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत असतात. दरम्यान नुकताच त्याने शेअर केलेला एक व्हिडीओ नेटीझन्सच्या आवडत्या व्हिडीओपैकी एक बनला आहे.

  • Share this:

मुंबई, 14 ऑगस्ट : अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) सोशल मीडियावर खूप सक्रीय असतो. त्याचे मजेदार व्हिडीओ, मजेदार कमेंट्स नेहमी नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत असतात. दरम्यान नुकताच त्याने शेअर केलेला एक व्हिडीओ नेटीझन्सच्या आवडत्या व्हिडीओपैकी एक बनला आहे. दिलजीतने स्मुदी बनवताना एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. पण यावेळी या अवलियाचं कोणाबरोबर भांडण झालं हे बघून तुम्हाला हसू आवरणार नाही. दिलजीतने चक्क Amazon ची व्हर्च्युअल असिस्टंट असणाऱ्या अलेक्सा (Alexa) बरोबर भांडण झाले. त्याने केलेल्या लाइव्ह दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. सोशल मीडियावर त्याने व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ खूप व्हायरल झाला असून चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

(हे वाचा-Highest Paid Actors: द रॉक' पहिल्या क्रमांकावर, टॉप 10 मध्ये अक्षय कुमार)

या व्हिडीओमध्ये स्मुदी बनवता बनवता दिलजीत Alexa ला त्याचे नवीन गाणे क्लॅश प्ले करण्यास सांगतो. पण Alexa ला काही केल्या ते गाणे सापडत नव्हते. त्याने पंजाबीमध्ये बऱ्याचशा सूचना दिल्यामुळे अलेक्सा देखील गोंधळते. शेवटी Alexa ला गाणं सापडतं आणि तिने ते प्ले केल्यावर पुन्हा एकदा दिलजीत पंजाबीमध्ये प्रतिक्रिया देतो. 'ए मेरा दिमाग खा गई...', त्याच्या या वाक्यावर नेटीझन्स खूप प्रतिक्रिया देत आहेत. याआधी देखील अशाप्रकारे व्हर्च्युअल असिस्टंटबरोबर भांडण झाल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, पण दिलजीतचा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या 'फेव्हरिट लिस्ट'मध्ये उच्च स्थानावर पोहोचला आहे.

View this post on Instagram

A post shared by DILJIT DOSANJH (@diljitdosanjh) on

चाहत्यांनी या व्हिडीओवर केलेल्या प्रतिक्रिया देखील फार मजेशीर आहे. एका युजरने म्हटले आहे की, हा आजचा आवडता व्हिडीओ आहे.'

दिलजीतच्या G.O.A.T या हिट अल्बममधील हे गाणं आहे, जे तो अलेक्साला प्ले करण्यासाठी सांगतो पण त्याचा पंजाबी भाषेचा लहेजा आणि मजेशीर इंग्रजीमुळे अलेक्साला ते गाणं शोधणं कठीण होऊन बसतं. दरम्यान नेटिझन्सचा या व्हिडीओला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 14, 2020, 1:18 PM IST

ताज्या बातम्या