क्वालालंपूर, 15 ऑगस्ट : सरप्राइझ कुणाला आवडत नाही. आपला वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा आपल्यासाठी एखादा महत्त्वाचा दिवस असो कुणीतरी आपल्याला सरप्राइझ द्यावं असं प्रत्येकाला वाटतं. अनेक जण आपल्या प्रिय व्यक्तीला वेगवेगळ्या पद्धतीने सरप्राइझ देतात. कुणी बलून, कँडलने घर सजवतं, कुणी केक किंवा ज्युसमध्ये रिंग टाकतं, असं सरप्राइझ तुम्ही आतापर्यंत पाहिलं आहे. हे आता काही नवं राहिलं नाही. मात्र मलेशियातील एका व्यक्तीने आपल्या बायकोला असं सरप्राइझ दिलं आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल.
इझात हाफिझ असं या व्यक्तीचं नाव आहे. इझातने आपली पत्नी एइनसाठी सोन्याची चैन खरेदी केली आणि ही चैन त्याने चक्क एअर फ्रायरमध्ये (Gold Chain in Air Fryer) लपवून ठेवली होती. जेणेकरून त्याची बायको एअर फ्रायर उघडले तेव्हा त्यामध्ये सोन्याची ती चैन पाहून ती सरप्राइझ होईल.
हे इतकंच नाही तर खरी स्टोरी तर पुढे आहे. ही चैन त्या एअर फ्रायरमध्ये एक-दोन दिवस नाही तर तब्बल दोन महिने पडून होती. मात्र या व्यक्तीने याबाबत आपल्या बायकोला अजिबात सांगितलं नाही.
हे वाचा - हाच खरा प्रिन्स! पक्ष्याच्या घरट्यासाठी दुबईच्या राजकुमारने आपली मर्सिडीज दिली
एइनने तीन महिने हा एअर फ्रायर वापरला नव्हता. तीन महिन्यांनी जेव्हा तिने तो उघडला तेव्हा तिली त्यामध्ये सोन्याची चैन मिळाली. तिनं याबाबत आपल्या नवऱ्याला विचारलं. तेव्हा त्याने ही चैन तिच्यासाठी खरेदी केली होती आणि दोन महिन्यांपूर्वी या एअर फ्रायरमध्ये ठेवल्याचं सांगितलं.
दोन महिने झाले तरी आपल्याला याबाबत का सांगितलं नाही हे एइनने विचारल्या इझातने सांगितलं, एइन कधी हा एअर फ्रायर उघडून त्यातील ही सोन्याची चैन पाहते याची प्रतीक्षा करत होता आणि ती चैन पाहून तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या भावना त्याला पाहायच्या होत्या.
हे वाचा - 'दिमाग खा गई...!' Alexa बरोबर झालं दिलजित दोसांझचं असं भांडण, पाहा VIDEO
एइनने आपल्या फेसबुकवर एअर फ्रायरसह या चैनचा फोटा टाकला आहे आणि आपल्या प्रेमळ नवऱ्याबाबतचा हा पूर्ण अनुभव शेअर केला आहे. टाइम्स नाऊशी बोलताना एइन म्हणाली, "त्याच्यामध्ये खूप संयम आहे. माझं कौतुक करायला त्याला खूप आवडतं. तो मला असे अनेक सरप्राइझ देत असतो. मात्र या सरप्राइझबाबत बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दही नाहीत. त्या भावना मी शब्दात व्यक्त करू शकत नाही"