मुंबई : ट्विटरची मालकी बदलली जागतिक बाजारपेठेतील बड्या कंपन्यांमधील अनेक मोठ्या पदावरचे अधिकारी आपल्या पदावरुन पायउतार होत आहेत. त्यामध्ये आता You Tube चं नाव देखील जोडलं गेलं आहे. You Tube च्या CEO ने आपल्या पदाचा राजीनामा दिला. सुसान वोजस्की यांनी राजीनामा दिला. त्यांच्या तडकाफडकी निर्णयामुळे चर्चा सुरू झाली आहे. यूट्यूब सीईओ सुसान वोजिकी यांनी तिच्या पदाचा राजीनामा दिल्याचं जाहीर केलं. त्यांनी एका ब्लॉगद्वारे ही माहिती दिली. वोजस्की गेल्या 9 वर्षांपासून यूट्यूब या ऑनलाइन व्हिडिओ प्लॅटफॉर्मशी संबंधित होत्या. त्यानंतर भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक नील मोहन हे पदभार सांभाळणार असल्याची माहिती मिळाली.
भारतातील यूट्युबर्स किती पैसे कमावतात? सोप्या शब्दात समजून घ्या कमाईचं गणितToday, after nearly 25 years at @Google, I’m stepping back to start a new chapter. I'm inspired every day by creators around the world who bring people together on @YouTube. It's been an honor to have a front row seat to this incredible community. https://t.co/063sYalPzX
— Susan Wojcicki (@SusanWojcicki) February 16, 2023
मोहन सध्या यूट्यूबमध्ये मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून काम करत आहे. वोजस्की म्हणाल्या की त्या तिच्या कुटुंबावरसह आरोग्याकडे आणि वैयक्तिक काही प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करणार आहेत त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. यापूर्वी वोजस्की यांनी गुगलमध्ये देखील काम केलं आहे. त्या 2014 पासून You Tube च्या CEO पदावर होत्या. त्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.