मराठी बातम्या /बातम्या /मनी /

नोकरी गेल्याने कर्ज घेऊन खरेदी केला 3 हजाराचा फोन; आज YouTube च्या माध्यमातून करतोय लाखोंची कमाई

नोकरी गेल्याने कर्ज घेऊन खरेदी केला 3 हजाराचा फोन; आज YouTube च्या माध्यमातून करतोय लाखोंची कमाई

पहिल्या व्हिडिओनंतर तीन महिन्यांनी मुंडा यांच्या बँक खात्यात 37 हजार रुपये आले. त्यानंतर त्यांना 5 लाख रुपये मिळाले आणि हे पैसे मिळणं सुरूच आहे

पहिल्या व्हिडिओनंतर तीन महिन्यांनी मुंडा यांच्या बँक खात्यात 37 हजार रुपये आले. त्यानंतर त्यांना 5 लाख रुपये मिळाले आणि हे पैसे मिळणं सुरूच आहे

पहिल्या व्हिडिओनंतर तीन महिन्यांनी मुंडा यांच्या बँक खात्यात 37 हजार रुपये आले. त्यानंतर त्यांना 5 लाख रुपये मिळाले आणि हे पैसे मिळणं सुरूच आहे

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 26 नोव्हेंबर : कोरोना महामारी आणि लॉकडाउन यानंतर अनेकांचं जीवन बदललं आहे. या काळात नोकरी, रोजगार गेल्यामुळे अनेक जण आर्थिक अडचणीत सापडले. काहींनी स्वत:च्या हिंमतीच्या बळावर रोजगाराचा नवा मार्ग शोधत बक्कळ पैसा कमावण्यास सुरुवात केली. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीची गोष्ट सांगणार आहोत. या व्यक्तीने लॉकडाउनमध्ये रोजगार गेल्यानंतर स्वतःचं यू-ट्यूब चॅनेल सुरू करून लाखो रुपये कमावण्यास सुरुवात केली आहे. इसाक मुंडा असं या व्यक्तीचं नाव आहे. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

एक सर्वसाधारण मजूर ते यू-ट्यूबर असा इसाक मुंडा यांचा प्रवास झाला आहे. एक छोटासा प्रयत्नही तुमचं आयुष्य बदलू शकतो, हेच यावरून दिसून येतं. आदिवासी समाजातील इसाक मुंडा हे ओडिशातल्या संबलपूर जिल्ह्यातल्या बाबुपली गावचे रहिवासी आहेत. मजुरी करून ते स्वतःचा व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. कोरोना लॉकडाउनमुळे त्यांचा रोजगार गेला. याच काळात ते एका मित्राच्या फोनवर यू-ट्यूब पाहत होते. त्यातून प्रभावित होऊन त्यांनी एके दिवशी स्वतःचं यू-ट्यूब चॅनेल सुरू केले व स्वत: जेवतानाचे व्हिडिओ ते पोस्ट करू लागले. या व्हिडिओला प्रतिसादही चांगला मिळू लागला असून, ते आता महिन्याला या माध्यमातून एक लाख रुपयांहून अधिक कमाई करत आहेत.

बिस्लेरीची डीलरशीप घेऊन करा लाखो रुपयांची कमाई, जाणून घ्या एजन्सी घेण्याची प्रक्रिया

आता तर मुंडा हे खाण्याव्यतिरिक्त विविध प्रकारचे व्हिडिओ बनवतात. काही व्हिडिओमध्ये ते मासेमारी करतानाही दिसतात. ते आपल्या व्हिडिओजमध्ये पत्नी सबिता मुंडा आणि मुली मोनिसा, मोनिका, महिमा आणि मुलगा पवित्रा यांनाही सहभागी करून घेतात. या व्हिडिओमध्ये ते त्यांच्या समुदायाच्या परंपरा, जीवन जगण्याची पद्धत दाखवतात. मुंडा यांची पत्नी म्हणते, 'आता मी खूप आनंदी आहे. कारण यामुळे आमची आर्थिक स्थिती बरीच सुधारली आहे. आता अन्न आणि इतर मूलभूत गरजा भागत आहेत.’

अशी झाली व्हिडिओ बनवण्यास सुरुवात

'इंडिया टाइम्स'च्या वृत्तानुसार, मुंडा हे रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. ते 2020 मध्ये लॉकडाउन सुरू असताना त्यांच्या मित्राच्या मोबाइलवर यू-ट्यूबवर व्हिडिओ पाहत असत. या व्हिडिओजमुळे ते खूप प्रेरित झाले आणि त्यांनी मित्राकडून 3,000 रुपये उधार घेऊन एक छोटा स्मार्टफोन खरेदी केला. मग त्यांनी स्वतःचं यू-ट्यूब चॅनेल सुरू केलं आणि त्या छोट्या फोनच्या मदतीनं व्हिडिओ बनवून ते चॅनेलवर पोस्ट करू लागले.

विवाहित जोडप्यांसाठी बेस्ट प्लॅन! प्रतिमहा गुंतवा फक्त 200 रुपये अन् दरवर्षी मिळवा 72,000 रुपये

मुंडा यांच्या व्हिडिओमध्ये वेगळं काही नाही. ते हिंदी आणि संबळपुरी भाषेत बोलतात. त्याचबरोबर गरीब व्यक्ती संघर्ष करून दोन वेळच्या अन्नाची व्यवस्था कशी करतात, हे ते व्हिडिओमध्ये दाखवतात. त्यांनी फिश करी, चिकन, जंगली मशरूम, लाल मुंग्या आणि गोगलगाय यांसारख्या स्थानिक खाद्यपदार्थांचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

पहिल्या व्हिडिओनंतर तीन महिन्यांनी म्हणजेच मुंडा यांच्या बँक खात्यात 37 हजार रुपये आले. त्यानंतर त्यांना 5 लाख रुपये मिळाले आणि हे पैसे मिळणं सुरूच आहे. ‘ओडीसाटीव्ही.इन’ला मुंडा यांनी सांगितलं की, ‘ऑगस्ट 2020 मध्ये मी यू-ट्यूबवरून 5 लाख रुपये कमावले. त्या पैशातून मी माझं घर बांधले आणि कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढलं. मी माझ्या क्षमतेनुसार गरजूंना मदत करण्याचं ठरवलं आहे.’

अचानक रोजगार गेल्यानंतर निराश न होता आर्थिक संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न केल्यास निश्चितच मार्ग सापडू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे इसाक मुंडा यांचा प्रवास आहे. मुंडा यांच्या या प्रवासाचं अनेक जण कौतुक करत आहेत.

First published:

Tags: Small business, Youtubers