मराठी बातम्या /बातम्या /मनी /

भारतातील यूट्युबर्स किती पैसे कमावतात? सोप्या शब्दात समजून घ्या कमाईचं गणित

भारतातील यूट्युबर्स किती पैसे कमावतात? सोप्या शब्दात समजून घ्या कमाईचं गणित

भारतातील यूट्युबर्स किती पैसे कमावतात? सोप्या शब्दात समजून घ्या कमाईचं गणित

भारतातील यूट्युबर्स किती पैसे कमावतात? सोप्या शब्दात समजून घ्या कमाईचं गणित

यूट्युबनं गेल्या तीन वर्षांत क्रिएटर्स, आर्टिस्ट आणि मीडिया संस्थांना जवळपास 30 अब्ज डॉलर्स दिले आहेत. 2019 मध्ये, टी-सिरीज हे 100 मिलियन युजर्सचा टप्पा पार करणारं पहिलं भारतीय यूट्युब चॅनल बनलं. अनेक यूट्युबर्सनी व्ह्युवर्सचे अशक्य वाटणारे आकडे ओलंडले आहेत. कोरोना साथीमुळे भारतात यूट्युबच्या वाढीला वेग मिळाला आहे.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 नोव्हेंबर: मोठ-मोठ्या सेलिब्रिटींना एक इन्स्टाग्राम पोस्ट करण्यासाठी कोट्वधी रुपये मिळतात, याबाबद्दल तुम्ही ऐकलेलं असेल. म्हणजेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रिटी पैसे कमवातात. तुम्हीदेखील घरबसल्या अशाप्रकारे पैसे कमवू शकता. यासाठी तुम्हाला यूट्युब या व्हिडिओ प्लॅटफॉर्मची मदत होईल. यूट्युबचे जगभरात 2.3 अब्ज पेक्षा जास्त युजर्स आहेत. 2020 मध्ये यूट्युबच्या वार्षिक कमाईमध्ये 30.4 टक्के वाढ झाली. एका वर्षात यूट्युबनं 19.7 बिलियनची कमाई केली, वार्षिक. यूट्युबवरचं लोकप्रिय मुलांची चॅनेल, रायन्स वर्ल्डनं 2020 मध्ये 29.5 मिलियन डॉर्लसची कमाई केली. फक्त व्हिडिओ अपलोड करून कोट्वधी रुपये कसे मिळवता येतात, याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का? भारतमध्येसुद्धा अशा काही व्यक्ती आहेत, ज्या यूट्युबच्या माध्यमातून पैसे कमवतात. ही कमाई कशी होते? व्ह्युज आणि रिव्हेन्युचं गणित कसं असतं?

यूट्युबनं गेल्या तीन वर्षांत क्रिएटर्स, आर्टिस्ट आणि मीडिया संस्थांना जवळपास 30 अब्ज डॉलर्स दिले आहेत. 2019 मध्ये, टी-सिरीज हे 100 मिलियन युजर्सचा टप्पा पार करणारं पहिलं भारतीय यूट्युब चॅनल बनलं. अनेक यूट्युबर्सनी व्ह्युवर्सचे अशक्य वाटणारे आकडे ओलंडले आहेत. कोरोना साथीमुळे भारतात यूट्युबच्या वाढीला वेग मिळाला आहे. साथीच्या रोगापूर्वी, व्हॉट्सअ‍ॅप हे भारतातील प्रबळ व्यासपीठ होतं. पण, अ‍ॅप अ‍ॅनीच्या डेटानुसार, डिसेंबर 2020 मध्ये यूट्युबचे मंथली अ‍ॅक्टिव्ह युजर्स 425 मिलियन होते, तर व्हॉट्सअ‍ॅपचे मंथली अ‍ॅक्टिव्ह युजर्स 422 मिलियन होते.

यूट्युब मनी कॅल्क्युलेटर-

हे यूट्युब मनी कॅल्क्युलेटर, तुम्ही खाली एंटर केलेल्या व्ह्युच्या सरासरी संख्येवर अवलंबून व्यापकपणे ओळखल्या जाणार्‍या सीपीएम श्रेणीची मोजणी करून यूट्युबवर किती पैसे कमवू शकता हे दाखवतं. चॅनेलवरील ट्रॅफिकची गुणवत्ता, सोर्स कंट्री, व्हिडिओचा विशिष्ट प्रकार, विशिष्ट जाहिरातींची किंमत, अॅडब्लॉक, वास्तविक क्लिक रेट इत्यादींवर आधारित असलेल्या सीपीएमची गणना करताना श्रेणीमध्ये चढ-उतार होऊ शकतात. एक हजार डेली व्ह्युजच्या माध्यमातून अंदाजे दोन डॉलर सीपीएम मिळतात. दोन डॉलर सीपीएममधून अंदाजे दिवसाला दोन हजार रुपये आणि महिन्याला साठ हजार रुपये मिळू शकतात. वर्षभरात एखादी व्यक्ती अंदाजे सात लाख 30 हजार रुपये मिळवू शकते.

हेही वाचा:  ‘या’ परवडणाऱ्या SUVची भारतात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी 1 लाखांहून अधिक ग्राहक रांगेत

भारतात यूट्युबवर पैसे कसे कमवायचे?-

यूट्युब पार्टनरशीप प्रोगॅमसाठी अर्ज करून पैसे कमावता येतात. यूट्युब कंटेंट क्रिएटर्सना त्यांच्या चॅनेलची जाहिरातीतील कमाई, चॅनल मेंबरशीप, सुपर चॅट्स आणि सुपर स्टिकर्स, मर्च शेल्फ्स आणि यूट्युब प्रीमिअम कमाईच्या माध्यमातून पैसे मिळवण्यास मदत करतं. तुम्‍ही यासाठी पात्र असल्‍यास यूट्युब शॉर्ट्स फंडाचा भाग म्‍हणून तुम्‍हाला शॉर्ट्स बोनसदेखील मिळू शकतो. यूट्युब पार्टनरशीप प्रोग्रॅमसाठी पात्र होण्यासाठी, तुमच्या यूट्युब चॅनेलला गेल्या 12 महिन्यांत चार हजार वॉच अवर्स आणि 10 हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स असणं आवश्यक आहे. अ‍ॅडव्हर्टायझिंग रिव्हेन्यु, चॅनेल मेंबरशीप, सुपर चॅट्स आणि सुपर स्टिकर्स, मर्च शेल्फ, यूट्युब प्रीमिअम रिव्हेन्यु यातील उत्पन्नाचा काही भाग यूट्युब आपल्या पात्र क्रिएटर्सना देतं.

तुमच्या व्हिडिओला व्ह्युज कुठून मिळतात यानुसार अ‍ॅडव्हर्टायझिंग रिव्हेन्युचा आकडा बदलतो. उदाहरणार्थ, बहुतेक व्ह्युज भारतातून मिळत असतील प्रतिहजार व्हिडिओ व्ह्युजमागे तुम्हाला1.5 ते 3 डॉलर्स मिळू शकतात. पण, जर तुमचे दर्शक युनायटेड स्टेट्समधील असतील तर तुम्हाला 2 ते 4 चार डॉलर्स मिळू शकतात. तुमच्‍या कंटेंटचं स्‍वरूप, टारगेट ऑडियन्स, तुम्‍ही किती कालवधीच्या फरकानं कंटेंट अपलोड करता, इत्‍यादीसह अनेक घटकांचा या आकडेवारीवर परिणाम होतो. त्‍यामुळे सीपीएम अंदाजानुसार तुम्‍ही यूट्युबवर किती पैसे कमवू शकता हे अचूकपणे सांगणं कठीण आहे.

भारतातील यूट्युबर्स किती पैसे कमवतात?-

काही यूट्युबर्स वर्षाला सुमारे 20 मिलियन डॉलर्स कमवतात. पण, यूट्युबर्स पार्टनरशीप प्रोग्रॅमच्या बाहेरूनदेखील पैसे कमवू शकतात, ही वस्तुस्थिती वरील प्रश्नाचं उत्तर देणं अवघड बनवते. उदाहरणार्थ, रायन कांजीनं मार्क्स आणि स्पेन्सर पायजामासह रायनच्या वर्ल्ड ब्रँडेड खेळणी आणि कपड्यांमधून अंदाजे 200 मिलियन डॉलर्स कमावले आहेत. त्यानं स्वत:च्या टेलिव्हिजन मालिकेसाठी निकेलोडियनशी एक मिलियन-डॉलरचा करारही केला आहे. त्याचप्रमाणे, भारतीय यूट्युबर्स आता 'यूट्युब ओरिजनल' बॅनरखाली स्वतःची मूळ वेब सीरिज तयार करत आहेत. युट्यूब ओरिजिनल्ससाठी भुवन भाम ‘धिंडोरा’ या सीरिजची निर्मिती करत आहे. सोशल ब्लेड, नॉक्स इन्फ्लुएन्सर, व्हिडिओओली यांसारखे प्लॅटफॉर्म तुम्हाला कंटेंट क्रिएटर्सची अंदाजे यूट्युब कमाई समजून घेण्यास मदत करतात.

व्हिडिओला मिळालेल्या व्ह्युजच्या संख्येनुसार तुमचा व्हिडिओ किती पैसे कमवू शकतो याबद्दल पुढे माहिती दिलेली आहे. यूएसमधील क्रिएटर्स आणि भारतीय क्रिएटर्सच्या कमाईमधील फरकही या ठिकाणी देण्यात आला आहे. व्हिडिओची श्रेणी, व्हिडिओची लांबी आणि प्रेक्षकांचा स्रोत यासह अनेक घटक यावर परिणाम करतात. 10 हजार व्ह्युज असल्यास यूएसमधील क्रिएटर्सना 50 ते 80 डॉलर्स मिळतात तर भारतातील क्रिएटर्सना 200 ते 500 रुपये मिळतात. व्ह्युजनुसार ही रक्कम वाढत जाते. 1,150 मिलियन व्ह्युज असल्यास यूएसमधील क्रिएटर्सना 80 हजार ते एक लाख डॉलर्स मिळतात तर भारतातील क्रिएटर्सना एक लाख ते सहा लाख रुपये मिळतात. काहीवेळा कमाईचे आकडे वरील अंदाजांपेक्षा पूर्णपणे भिन्न असू शकतात.

भारतात यूट्युब चॅनल श्रेणीनुसार किती कमाई होते आणि भविष्यात काय संधी आहेत?

भारतात व्हिडिओच्या श्रेणीनुसार कमाईची आकडेवारी बदलते. एक मिलियन व्ह्युजच्या माध्यमातून कोणत्या व्हिडिओ श्रेणीतील क्रिएटर किती कमाई करू शकतो याबाबत पुढे माहिती दिली आहे. कॉमेडी व्हिडिओसाठी 22 ते 30 हजार रुपये, म्युझिक व्हिडिओसाठी सात ते 11 हजार, टेक्नॉलॉजीसाठी व्हिडिओसाठी 14 ते 22 हजार, रोस्टिंग व्हिडिओसाठी 18 ते 29 हजार, फूड व्हिडिओसाठी सात ते 11 हजार आणि गेमिंग व्हिडिओसाठी सात ते 14 हजार रुपये मिळू शकतात.

यूट्युब हे भारतातील प्रबळ व्यासपीठ आहे. इन्स्टाग्राम रील्सच्या एंट्रीनंसुद्धा प्लॅटफॉर्मच्या वर्चस्वाला फारसा धक्का बसलेला नाही. नुकत्याच जाहीर केलेल्या 100 मिलियन डॉलर्स यूट्युब शॉर्ट्स फंडासारख्या उपक्रमांच्या मदतीनं या प्लॅटफॉर्म सर्व TikTok क्रिएटर्सना आकर्षित केलं आहे. यूट्युब मनी कॅल्क्युलेटर हे तुमची कमाईची क्षमता ठरवण्यासाठी एक उत्तम साधन आहे.

First published:

Tags: Youtube, YouTube Channel, Youtubers