Home /News /videsh /

तैवानवर हल्ला झाला तर भारतासह जगावर काय परिणाम होईल? तंत्रज्ञान क्षेत्रच ठप्प होऊ शकतं, काय आहे कारण?

तैवानवर हल्ला झाला तर भारतासह जगावर काय परिणाम होईल? तंत्रज्ञान क्षेत्रच ठप्प होऊ शकतं, काय आहे कारण?

कोरोना काळात जेव्हा चीनमधून होणाऱ्या सेमीकंडक्टर्सच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता तेव्हा तैवानमुळेच जगभरात सेमीकंडक्टर्सचा पुरवठा झाला होता.

    नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : अमेरिकेच्या सिनेटच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी (Nancy Palosi) यांच्या तैवान दौऱ्यानंतर चीन हादरलं आहे. चीन आणि तैवानमधला तणाव (China-Taiwan Tension ) वाढला आहे. तसंच या भेटीचा संपूर्ण जगावर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. चीन तैवानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. तैवान आणि चीनमधला तणाव वाढला तर त्याचे जगावर काय परिणाम होतील याचा अंदाज आता जगभरातील तज्ज्ञ लावत आहेत. या तणावाचा भारतासह अन्य देशांच्या तंत्रज्ञान क्षेत्रावर सगळ्यांत जास्त परिणाम होणार असल्याचं सांगितलं जात आहे. यात सेमीकंडक्टर चिपच्या (Semiconductor Chip) तंत्रज्ञानाचाही समावेश आहे. लाईव्ह हिंदुस्थानच्या वेबसाईटवर याबद्दलचं वृत्त देण्यात आलं आहे. यामुळे फक्त मोबाईल कंपन्यांवरच परिणाम होईल असं नाही तर कार कंपन्यांनाही याचा चांगलाच फटका बसू शकतो. तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (Taiwan Semiconductor Manufacturing Company) ही जगातील सगळ्यात मोठी सेमीकंडक्टर कंपनी आहे. सेमीकंडक्टरच्या बाबतीत या कंपनीचा प्रचंड दबदबा आहे. जागतिक मार्केटमधील जवळपास 92% मागणी हीच कंपनी पूर्ण करते. यावरून तिचं महत्त्व लक्षात येऊ शकतं. इलेक्ट्रॉनिक्स, कॉप्युटर्स, स्मार्टफोन, कारच्या सेन्सर्समध्येही मोठ्या प्रमाणावर सेमीकंडक्टरचा वापर केला जातो. जगभरातल्या गाड्यांमध्ये सेमीकंडक्टरचा वापर होतो. कर्जदाराच्या मृत्यूनंतर कर्ज फेडण्याची जबाबदारी कुणाची असते? बँकेचे नियम काय सांगतात चीन-तैवान दरम्यानचा वाढता तणाव बघता त्याचा भारतावर सगळ्यांत जास्त परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधी रशिया-युक्रेनच्या युद्धाचे (Russia-Ukraine War) परिणाम भोगावे लागले आणि त्यात आता चीन-तैवानमध्ये युद्ध होण्याची शक्यता असल्याने संपूर्ण जगावरच भीतीचं सावट आहे. जर असं झालं तर सेमीकंडक्टरच्या कमतरतेचा धोका पुन्हा एकदा निर्माण होईल. जर चीनबरोबरचा तणाव आणि संघर्ष आणखी वाढला तर तैवानच्या चिप निर्मात्यांना ‘नॉन ऑपरेट’ केलं जाईल, असं तैवानच्या सेमीकंडक्टचर चिप निर्माता TSMSC चं म्हणणं आहे, साहजिकच याचा परिणाम आपल्यावरही होईल, असं इंडियन फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनचे (Indian Federation Of Automobile Dealers Association) अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी सांगितलं. भारताचं ऑटोमोबाईल क्षेत्र प्रभावित 2020 ची आकडेवारी पाहिली तर जगभरातील एकूण सेमीकंडक्टर चिपच्या उत्पादनात 63 टक्के उत्पादन एकट्या तैवानमधून होतं. म्हणजेच जगभरातील 10 सेमीकंडक्टर चिपमधील 6 किंवा 7 चिप तैवानच्या कंपनीचे असतात. भारताबद्दल बोलायचं झालं 2022मध्ये वार्षिक आकडेवारीनुसार तर ऑटोमोबाईल विक्रीमध्ये 8 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली, असं एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनद्वारा जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सध्याच्या परिस्थितीत ही घसरण सातत्याने पाहायला मिळत आहे. आता नॅन्सी पेलॉसी यांच्या या दौऱ्यामुळे संतापलेला चीन तैवानची समस्या कशी हाताळतो हे पाहणं आपल्यासाठीही महत्त्वाचं आहे. जर चीननं तैवानवर हल्ला केला तर सेमीकंडक्टर्सच्या बाबतीत अन्य देशांचं होईल तितकंच नुकसान चीनचंही होणार आहे. तैवानमधून सेमीकंडक्टर्सची कमतरता निर्माण झाली तर संपूर्ण उद्योग क्षेत्रच ठप्प होऊ शकतं. Video: मशीन समजून रोबोला लाथ मारणं तरुणाला पडलं महागात; 3 रोबोंनी घेरून केली चांगलीच धुलाई चीननं तैवानवर हल्ला केला तर जगातील सगळ्यात ॲडव्हान्स्ड चिप फॅक्टरी काम करू शकणार नाही, असा इशारा तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे चेअरपर्सन मार्क लिऊ यांनी आधीच दिला होता. आम्ही पूर्णपणे ग्लोबल चेन सप्लायवर अवलंबून आहोत. त्यामुळे अशा युध्दजन्य परिस्थितीत आमच्यासाठी काम करणं अवघड होईल. आणि जर सेमीकंडक्टर्सचा पुरवठा झाला नाही तर जगातील अनेक भागांमध्ये कदाचित नवीन मोबाईल, कंप्युटर्स आणि अगदी गाड्याही चालू शकणार नाहीत. ॲपल (Apple) आणि मायक्रोसॉफ्टसारख्या (Microsoft) नामांकित टेक कंपन्याही सेमीकंडक्टर्ससाठी तैवानवरच अवलंबून आहेत. कोरोना काळात जेव्हा चीनमधून होणाऱ्या सेमीकंडक्टर्सच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता तेव्हा तैवानमुळेच जगभरात सेमीकंडक्टर्सचा पुरवठा झाला होता. रशियानं युक्रेनवर हल्ला केला त्यानंतर जगभरात गव्हासारख्या धान्य आणि अन्य वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला होता. आता जर तैवान आणि चीनमधला संघर्ष वाढला तर तांत्रिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
    First published:

    Tags: International, Tech news

    पुढील बातम्या