जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Video: मशीन समजून रोबोला लाथ मारणं तरुणाला पडलं महागात; 3 रोबोंनी घेरून केली चांगलीच धुलाई

Video: मशीन समजून रोबोला लाथ मारणं तरुणाला पडलं महागात; 3 रोबोंनी घेरून केली चांगलीच धुलाई

Video: मशीन समजून रोबोला लाथ मारणं तरुणाला पडलं महागात; 3 रोबोंनी घेरून केली चांगलीच धुलाई

मानव श्रेष्ठ की मशीन हा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. पण मानवानेच मशीन बनवली असल्याने तो श्रेष्ठ असा समज सर्रासपणे करण्यात येतो; पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा समज किती चुकीचा आहे याची प्रचिती येऊ शकते.

  • -MIN READ Trending Desk Viralimalai,Pudukkottai,Tamil Nadu
  • Last Updated :

    मुंबई, 06 ऑगस्ट : सोशल मीडियाच्या माध्यमातून जगातील अनेक नवनवीन गोष्टी कळत असतात. दरदिवशी असंख्य व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतात. यात मनोरंजनात्मक, आश्चर्यचकित करणारे व्हिडिओही खूप असतात. असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या ट्विटरवर व्हायरल (video Viral On Twitter) झाला आहे. यात एका रोबोला (Robot) छेडल्यानंतर आजुबाजूचे आणखी दोन रोबो एकत्र येऊन तरुणाची चांगलीच धुलाई करत असल्याचं दिसतंय. मानव श्रेष्ठ की मशीन हा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. पण मानवानेच मशीन बनवली असल्याने तो श्रेष्ठ असा समज सर्रासपणे करण्यात येतो; पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा समज किती चुकीचा आहे याची प्रचिती येऊ शकते. एक तरुण एस्केलेटरवरून (Escalator) खाली उतरताना बाजूला रोबोशी थट्टा करण्यासाठी त्याला लाथ मारतो. परंतु, याचे परिणाम त्याला भोगावे लागतात. त्या रोबोसह इतर दोन रोबो येऊन तरुणाला चांगलेच बदडतात, असं दृश्य या व्हिडिओत दिसतं. काय दाखवलं आहे व्हिडिओत? ट्विटरवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक रोबो एस्केलेटरच्या (सरकते जिने) बाजूला थांबून ये-जा करणाऱ्यांचे तापमान मोजत असतो. पायऱ्यांवरून खाली उतरताना एक तरुण त्याच्याशी थट्टा करतो. तापमान मोजण्याऐवजी तो तरुण त्याला लाथ मारतो. रोबो हे मशीन असल्याने त्याला भावना नाहीत त्यामुळे काहीच प्रतिक्रिया मिळणार नाही, असा समज त्या तरुणाचा असतो; पण लाथ मारून पुढे जाताच रोबोही त्याला बदडण्यासाठी त्याचा मागे धावू लागतो. आजूबाजूला असलेले दोन रोबोही तिथे तत्काळ पोहोचतात आणि तिघे मिळून त्या तरुणाची चांगलीच धुलाई करतात. त्या तीन रोबोच्या हातात वेगवेगळ्या प्रकारची हत्यारंही दिसत आहेत. हे वाचा -  डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर व्हिडिओला मिळतेय प्रचंड पसंती या व्हिडिओला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @TansuYegen या हँडलच्या माध्यमातून शेअर करण्यात आलं आहे. काही तासांमध्येच या व्हिडिओला 1 लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे आणि 3200 लोकांनी पसंत केलं आहे. 700 पेक्षा अधिक वेळा या व्हिडिओला रिट्विट (Retweet) करण्यात आलं आहे. या व्हिडिओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. मशीनलाही भावना असतात असं एक युजर म्हणतो. तर भविष्यात आता असंच काहीसं होणार असल्याचं भाकीत दुसऱ्या युजरने वर्तवलं आहे.

    जाहिरात

    सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहताना मनोरंजन हा हेतू खूप लोक समोर ठेवतात; पण त्यावर विचार केल्यास नवीन गोष्टीही शिकायला मिळतात. रोबोसारखी मशीन केवळ कामापुरती असतात असं आजवर समजलं जायचं पण त्यांना भावनाही असू शकतात, हे या व्हिडिओतून दिसून आलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात