जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / अमेरिकेनं 20 वर्ष जगापासून लपवलेलं 9/11 चं सत्य अखेर उघड, पाहा PHOTO

अमेरिकेनं 20 वर्ष जगापासून लपवलेलं 9/11 चं सत्य अखेर उघड, पाहा PHOTO

अमेरिकेनं 20 वर्ष जगापासून लपवलेलं 9/11 चं सत्य अखेर उघड, पाहा PHOTO

अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 11 सप्टेंबर (9/11 attack) रोजी 20 वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्याचे आजवर कधीही न पाहिलेले फोटो प्रसिद्ध झाले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

न्यूयॉर्क, 9 सप्टेंबर : अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 11 सप्टेंबर रोजी 20 वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्यीत जवळपास 3 हजार जणांचा मृत्यू झाला तर 25 हजार जण जखमी झाले होते. अमेरिकेत झालेला हा हल्ला लाखो लोकांनी पाहिला. तसंच त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आजवर समोर आले आहेत. आता या हल्ल्याला 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अमेरिकन गुप्तचर संघटनेनं  (American Secret Service) आजवर कधीही न पाहिलेले फोटो शेअर केली आहेत. या दुर्मिळ फोटोमधून हल्ल्याचं नव रुप समोर आलं आहे. 11 सप्टेंबरला सकाळी 10 च्या सुमारास फ्लाईट 11 हे विमान नॉर्थ टॉवरला तर त्यानंतर काही वेळातच आणखी एक प्रवासी विमान फ्लाईट 175 साऊथ टॉवरला धडकले होते.

News18

द सिक्रेट सर्विसनं नुकतच एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी 11 सप्टेंबरला या हल्ल्याला 20 वर्ष झाल्याच्या निमित्तानं आजवर कधीही न पाहिलेले काही फोटो शेअर करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये काही पोलीस ढिगाऱ्या धुळीमध्ये माखलेले दिसत आहेत. तर एका फोटोत ग्राऊंड झिरोवरील ढिगारा आणि आकाशातील राख दिसत आहे.

News18

1999 कंधार हायजॅकचा मास्टरमाईंड मुल्ला उमरचा मुलगा अफगाणिस्तानचा संरक्षण मंत्री या विषयावर ‘9-11: Life Under Attack’  ही डॉक्यूमेंटरी देखील प्रदर्शित करण्यात आली आहे. यामध्ये या हल्ल्यात वाचलेल्या लोकांचे अनुभव दाखवण्यात आले आहेत. सिक्रेट एजन्सनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये या हल्ल्यानं अमेरिकन नागरिकांची झालेली अवस्था मांडण्यात आली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी हे फोटो शेअर केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात