मराठी बातम्या /बातम्या /विदेश /1999 कंधार हायजॅकचा मास्टरमाईंड मुल्ला उमरचा मुलगा अफगाणिस्तानचा संरक्षण मंत्री

1999 कंधार हायजॅकचा मास्टरमाईंड मुल्ला उमरचा मुलगा अफगाणिस्तानचा संरक्षण मंत्री

तालिबानच्या सरकारमध्ये तालिबानचे संस्थापक मुल्ला उमर यांचा मुलगा मुल्ला याकूबची अफगाणिस्तानचे नवे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तालिबानच्या सरकारमध्ये तालिबानचे संस्थापक मुल्ला उमर यांचा मुलगा मुल्ला याकूबची अफगाणिस्तानचे नवे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तालिबानच्या सरकारमध्ये तालिबानचे संस्थापक मुल्ला उमर यांचा मुलगा मुल्ला याकूबची अफगाणिस्तानचे नवे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अफगाणिस्तान, 09 सप्टेंबर: तालिबाननं अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan)नव्या सरकारची घोषणा केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन तालिबाननं (Taliban government) आपल्या मंत्रिमंडळ देखील जाहीर केलं. तालिबानच्या सरकारमध्ये तालिबानचे संस्थापक मुल्ला उमर यांचा मुलगा मुल्ला याकूबची अफगाणिस्तानचे नवे संरक्षण मंत्री (Defense minister) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुल्ला याकूब हा त्याच मुल्ला उमरचा मुलगा आहे ज्यानं 1999 मधला कंधार हायजॅकचा मास्टरमाईंड होता. 24 डिसेंबर 1999 रोजी जैश-ए-मोहम्मदचा नेता मसूद अझहर, अल-उमर मुजाहिदीनचा नेता मुश्ताक अहमद जरगर आणि अल-कायदाचा नेता अहमद उमर सईद शेखच्या सुटकेसाठी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सचे विमान IC-814 हायजॅक केलं होतं. दहशतवाद्यांनी नेपाळची राजधानी काठमांडू येथून उड्डाण केलेलं हे विमान अफगाणिस्तानच्या कंधार येथे नेलं होतं. तेव्हा कंधारमध्ये तालिबानचं राज्य होतं. हे तिन्ही दहशतवादी भारतीय तुरुंगात होते. या विमानात 176 प्रवासी होते, ज्यांना 7 दिवस अपहरणकर्त्यांनी ओलीस ठेवलं होतं.

हे हायजॅक ऑपरेशन पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIच्या मदतीने करण्यात आलं होतं, असं बोललं जात. मुल्ला उमर या ऑपरेशनचा मास्टरमाईंड होता. जेव्हा विमान कंधारला पोहोचले तेव्हा तालिबानी दहशतवाद्यांनी विमानाला चारही बाजूंनी घेरलं होतं. दहशतवाद्यांना सामोरे जाण्यासाठी भारताला लष्करी कारवाई करायची होती, तेव्हा तालिबान आणि मुल्ला उमर यांनी परवानगी दिली नाही.आता हा मुल्ला उमरचा मुलगा मुल्ला मोहम्मद याकोब हा अफगाणिस्तानचा संरक्षण मंत्री असणार आहे.

राज्यातल्या आरोग्य विभागाची किमया, लसीकरणात पुन्हा एकदा नवा रेकॉर्ड

गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी

तालिबाननं अमेरिकेतील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सिराजुद्दीन हक्कानीला (Sirajuddin Haqqani) अफगाणिस्तानचा नवा गृहमंत्री म्हणून नियुक्त केलं आहे. सिराजुद्दीन हक्कानीचे नावही जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत आहे. त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला अमेरिकेनं 50 लाख डॉलरचं बक्षीस जाहीर केलं आहे.

आजपासून 13 वी ब्रिक्स परिषद, पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षस्थानी

तालिबानचे मुख्य प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी पत्रकार परिषदेत नवीन सरकारविषयी माहिती दिली. तालिबानी सरकारमध्ये मुल्ला मोहम्मद हसन अखुंद (Mullah Mohammad Hasan Akhund) यांना पंतप्रधान करण्यात आले आहे. तालिबानचा नंबर दोन नेते म्हणून मुल्ला गनी बरादर (Mulla Ghani Baradar) उप पंतप्रधानांच्या भूमिकेत असतील. बरदार यांच्यासह मुल्ला अब्दास सलाम यांनाही मोहम्मद हसन अखुंद यांची उपपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Afghanistan, Taliban