COVID-19: कोरोनाबाबत WHOने घेतला यू-टर्न, सगळ्यांसमोर केली चीनची पोलखोल

जागतिक आरोग्य संघटना (WHO) आता नव्या अडचणीत सापडली आहे. जगातील बर्‍याच देशांकडून टीकेचा सामना कराव्या लागणाऱ्या WHOनं आता आणखी एक अजब दावा केला आहे.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) आता नव्या अडचणीत सापडली आहे. जगातील बर्‍याच देशांकडून टीकेचा सामना कराव्या लागणाऱ्या WHOनं आता आणखी एक अजब दावा केला आहे.

  • Share this:
    जिनिव्हा, 04 जुलै : जगभरात कोरोनाव्हायरस थैमान घालत आहे. सध्या 1 कोटींहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण जगात आहेत. यातच आता जागतिक आरोग्य संघटना (WHO) आता नव्या अडचणीत सापडली आहे. जगातील बर्‍याच देशांकडून टीकेचा सामना कराव्या लागणाऱ्या WHOनं आता आणखी एक अजब दावा केला आहे. यापूर्वी WHOकडून सांगण्यात आले होते की गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनने त्यांना कोरोनाबद्दल माहिती दिली होती, परंतु आता त्यांनी याबाबत यू टर्न घेतला आहे. WHOने कोरोनासंदर्भात तयार केलेल्या नवीन टाइमलाइनमध्ये चीनची पोलखोल केली आहे. यामध्ये त्यांनी चीननं त्यांना कोरोनाबद्दल सांगितले आहे, याची नोंद नाही आहे. WHOच्या या निर्णयामुळे त्याच्या कामकाजाबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. काही आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनी WHO कोणालाही न सांगता आपले घटनाक्रम बदलल्याचे सांगितले आहे. वाचा-कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सरकारची नवी गाइडलाइन, कमी केला 'या' औषधाचा डोस याआधी सहा महिन्यांपूर्वी, WHO ने दावा केला आहे की 31 डिसेंबर 2019 रोजी चीनने त्यांना कोरोनाबद्दल माहिती दिली होती. WHOने असेही सांगितले होते की, वुहान नगरपालिकेच्या आरोग्य आयोगाने आधी न्युमोनिया असल्याचे नोंदवले मात्र नंतर हा कोरोनाव्हायरस असल्याचे सांगितले. WHOने घेतला यू-टर्न WHOनेस्पष्टपणे सांगितले की व्हायरसबाबत माहिती 31 डिसेंबर रोजी मिळाली आणि चीनने त्यांना याबाब माहिती दिली. अपडेट करण्यात आलेल्या टाइमलाइनमध्ये मात्र या तारखेचा उल्लेख नाही आहे. आता WHOने असे सांगितले आहे की, चीनमधील WHOच्या कंट्री ऑफिसला वुहान महानगरपालिकेनं न्युमोनियाबाबत माहिती दिली होती. मात्र आता WHOने मोठ्या चतुराईने कोरोना विषाणूची टाइमलाइन बदलली. वाचा-COVAXIN - भारत बायोटेक बनवणार जगातील पहिली कोरोना लस? कंपनीने दिली प्रतिक्रिया याआधी WHOने केले होते चीनचे कौतुक याआधी WHOच्या प्रमुखांनी कोरोनाचा सामना केल्याबाबत जाहीरपणे चीनचे कौतुक केले होते. त्यांनी साथीच्या रोगाचे राजकारण करू नये, असे आवाहन केले आणि आता ते म्हणत आहेत की चीनने कोरोना विषाणूबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. टाइमलाइनमधील या बदलांमुळे केवळ चीनचा खरा चेहरा समोर आला नाही तर WHOच्या विश्वासार्हतेवरही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. वाचा-भारतीयांनी करून दाखवलं! वाचा कशी तयार झाली Made in India कोरोना वॅक्सीन संपादन-प्रियांका गावडे.
    First published: