Home /News /national /

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सरकारची नवी गाइडलाइन, कमी केला 'या' गुणकारी औषधाचा डोस

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सरकारची नवी गाइडलाइन, कमी केला 'या' गुणकारी औषधाचा डोस

आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी नवीन मार्गदर्शत तत्वे जारी करण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 04 जुलै : देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे भारतानं स्वदेशी लसीसाठीची तयारी सुरू केली आहे. याआधी आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी नवीन मार्गदर्शत तत्वे जारी करण्यात आली आहे. यात आता कोरोनाच्या उपचारात प्रभावी औषध मानल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हिर (Remdesivir) औषधाचा डोस कमी करण्यात आला आहे. आता हे औषध रुग्णांना 6 दिवसांऐवजी 5 दिवस दिले जाणार आहे. रेमडेसिव्हिर एक अँटी-व्हायरल औषध आहे आणि कोरोनाबाधितांना हे औषध दिले जाते. शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली. वाचा-COVAXIN - भारत बायोटेक बनवणार जगातील पहिली कोरोना लस? कंपनीने दिली प्रतिक्रिया आरोग्य मंत्रालयाच्या नवीन प्रोटोकॉलमध्ये असे म्हटले आहे की हे औषध इंजेक्शन स्वरूपात रुग्णांना दिले जाईल. पहिल्या दिवशी, रूग्णाला इंजेक्शनच्या स्वरूपात 200 मिलीग्राम रेमडेसिव्हिरचा डोस दिला जाईल, त्यानंतर पुढील चार दिवस 100-100 मिलीग्राम डोस रुग्णाला दिला जाईल. किडनी, लिव्हरचे आजार असलेल्या रुग्णांना दिले जाणार नाही रेमडेसिव्हिर 13 जून रोजी आरोग्य मंत्रालयाने रेमडेसिव्हिर वापरण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाने आपत्कालीन परिस्थितीत रेमडेसिव्हिरच्या वापरास मर्यादित वापराखाली परवानगी दिली होती. दरम्या, मूत्रपिंड, यकृत रोग, गर्भवती महिला, स्तनपान देणाऱ्या महिला आणि 12 वर्षाखालील मुलांना हे औषध देण्यात येणार नाही. वाचा-हात चेहऱ्याजवळ जाताच वाजणार अलार्म; NASAचं उपकरण कोरोनाला दूर ठेवण्यात मदत करणार हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीनबाबत दिला सल्ला आरोग्य मंत्रालयानेही हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन विषयी सल्ला दिला आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की या औषधाचा वापर रोगाच्या सुरुवातीच्या काळात असावा. मंत्रालयाने असे म्हटले आहे की हे औषध गंभीर आजारी व्यक्तीस दिले जाऊ नये. वाचा-भारतीयांनी करून दाखवलं! वाचा कशी तयार झाली Made in India कोरोना वॅक्सीन संकलन-प्रियांका गावडे.
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Corona virus

    पुढील बातम्या