मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

COVAXIN - भारत बायोटेक बनवणार का जगातील पहिली कोरोना लस? कंपनीने दिली प्रतिक्रिया

COVAXIN - भारत बायोटेक बनवणार का जगातील पहिली कोरोना लस? कंपनीने दिली प्रतिक्रिया

15 ऑगस्टपर्यंत ही कोरोना लस लाँच होईल, असं सांगितलं जातं आहे.

15 ऑगस्टपर्यंत ही कोरोना लस लाँच होईल, असं सांगितलं जातं आहे.

15 ऑगस्टपर्यंत ही कोरोना लस लाँच होईल, असं सांगितलं जातं आहे.

नवी दिल्ली, 03 जुलै : जगातील मोठ्या देशांना जे जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं आहे. भारतात तयार करण्यात आलेली कोरोनाची लस 15 ऑगस्टपर्यंत भारतात लाँच केली जाण्याची शक्यता आहे. देशात 5 दिवसांच्या आत क्लिनिकल वापरासाठी शासनाकडून ही मंजुरी मिळालेली दुसरी लस असल्याची माहिती मिळाली आहे. COVAXIN असं या लशीचं नाव आहे. हैदराबादमधील भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीने ही लस तयार केली आहे. इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्च (ICMR) आणि पुण्यातील नेशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीसह मिळून ही लस तयार करण्यात आली आहे. या कंपनीच्या लशीच्या ह्युमन ट्रायलला CDSCO करून हिरवा कंदील मिळाला आहे. आयसीएआरच्या परिपत्रकानुसार 7 जुलैपासून या लसीचं ह्युमन ट्रायल सुरू होणार आहे. शिवाय 15 ऑगस्टपर्यंत ही लस लाँच होईल, असं सांगितलं जातं आहे. दरम्यान आता भारत बायोटेकने याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भारत बायोटेकने नियमांनुसार COVAXIN या कोरोनो लशीची प्राण्यांवर चाचणी केली आहे आता ही लस क्लिनिकल ट्रायलच्या पुढील टप्प्यात आहे. असं भारत बायोटेकचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. कृष्णा इल्ला यांनी फर्स्टपोस्टला सांगितलं. डॉ. कृष्णा इल्ला यांनी सांगितलं,  "पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीमार्फत कोरोनाव्हायरसचा स्ट्रेन आयसोलेट करून ठेवला होता. हा स्ट्रेन इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चकडे सोपवण्यात आला. हा आयसोलेटेड स्ट्रेन भारत बायोटेकमध्ये कोरोना लशीसाठी वापरण्यात आला. आणि या स्ट्रेनमुळेच ही लस लवकरात लवकर बनवणं शक्य झालं. 40 दिवसांतच आम्ही लस तयार केली आणि त्याचं प्री क्लिनिकल ट्रायल केलं. भारतातील आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या क्लिनिकल ट्रायलच्या नियमांनुसार आम्ही ट्रायल केलं.  COVAXIN ही लस प्राण्यांवर सुरक्षित असल्याचं दिसून आलं. आता क्लिनिकल ट्रायलच्या पुढच्या टप्प्यात आहोत" हे वाचा - कोरोना वॅक्सीनमध्ये भारताला मोठं यश! 15 ऑगस्टपर्यंत येणार COVID-19ची लस "COVAXIN या लशीत निष्क्रिय व्हायरस आहे. याआधीदेखील काही लशींमध्ये निष्क्रिय व्हायरस वापण्यात आले आहे. सिझनल इन्फ्लूएंझा, पोलिओ, रेबीज, जापनीज एनसेफेलायटिस यासारख्या आजारांवरही अशाच पद्धतीने लस तयार करण्यात आली आहे. माणसाच्या शरीरात ही लस दिल्यानंतर हा निष्क्रिय व्हायरस त्या व्यक्तीला संक्रमित करत नाही किंवा व्हायरसचं प्रतिरूप तयार होत नाही कारण हा मृत व्हायरस आहे. रोगप्रतिकारक प्रणालीत तो मृत व्हायरस म्हणूनच राहतो आणि सक्रिय व्हायरसला प्रतिरोध करण्यास मदत करतो", असं डॉ. इल्ला यांनी सांगितलं. हे वाचा - भारतीयांनी करून दाखवलं! वाचा कशी तयार झाली Made in India कोरोना वॅक्सीन दरम्यान या लशीच्या किमतीबाबत सांगताना इल्ला म्हणाले, "आम्ही सार्वजनिक आरोग्यावर लक्ष केंद्रीत करतो. जगातील उत्तम दर्जाची लस परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. याआधीदेखील आम्ही अशा लस उपलब्ध करून दिल्यात आणि COVAXIN बाबतही तसंच असेल अशी आशा आम्हाला आहे. या लशीची किंमत किती असेल याबाबत आताच बोलणं खूप लवकर होईल" संकलन, संपादन - प्रिया लाड
First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus

पुढील बातम्या