जाहिरात
मराठी बातम्या / देश / भारतीयांनी करून दाखवलं! वाचा कशी तयार झाली Made in India कोरोना वॅक्सीन

भारतीयांनी करून दाखवलं! वाचा कशी तयार झाली Made in India कोरोना वॅक्सीन

जागतिक आरोग्य संघटनाही त्यासाठी अनेक देशांना मदत करत असून हे प्रचंड खर्चाचं आणि मनुष्यबळ लागणारं काम असल्याने त्याचं काटेकोर नियोजन करावं लागणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनाही त्यासाठी अनेक देशांना मदत करत असून हे प्रचंड खर्चाचं आणि मनुष्यबळ लागणारं काम असल्याने त्याचं काटेकोर नियोजन करावं लागणार आहे.

या लसीच्या ह्युमन ट्रायलनंतर 15 ऑगस्टपर्यंत भारत बायोटेक, ICMR कडून ही लस भारतात लाँच केली जाऊ शकते. 7 जुलैला पहिल्यांदा ह्युमन ट्रायल करण्यासाठी परवानगी मिळाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 03 जुलै : देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, ठोस उपाय होत असल्यानं रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत होते. मात्र आता रुग्णांवर उपचार करणारी मेड इन इंडिया लस 15 ऑगस्टपर्यंत येणार आहे. या लसीच्या ह्युमन ट्रायलनंतर 15 ऑगस्टपर्यंत भारत बायोटेक, ICMR कडून ही लस भारतात लाँच केली जाऊ शकते. 7 जुलैला पहिल्यांदा ह्युमन ट्रायल करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. COVAXIN असं या लसीचं नाव असू शकेल असंही सांगण्यात येत आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हे वॅक्सीन कसं काम करणार हे 7 जुलैला पहिल्या ह्युमन ट्रायलनंतर कळू शकणार आहे. आतापर्यंत कोरोनावर 125 हून अधिक वॅक्सीनवर काम सुरू आहे. मात्र त्यापैकी भारतात ह्युमन ट्रायलसाठी परवानगी मिळाली आहे. ही लस 15 ऑगस्टपर्यंत उपलब्ध झाली तर भारत पहिला देश असेल, ज्याकडे कोरोनावर उपचार करणारी लस असेल. वाचा- कोरोना वॅक्सीनमध्ये भारताला मोठं यश! 15 ऑगस्टपर्यंत येणार COVID-19ची लस अशी तयार केली झाली भारतीय लस ICMR रच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (NIV) मिळून बीबीआयएलने COVAXIN लस विकसित केली आहे. ही लस तयार करण्यासाठी NIVने कोरोनाची लागण झालेल्या पण कुठलीही लक्षणं नसलेल्या रुग्णाच्या शरीरातून कोरोना व्हायरसचा स्ट्रेन वेगळा काढला. त्यानंतर हा स्ट्रेन बीबीआयएलला पाठवण्यात आला. बीबीआयएलने त्या स्ट्रेनपासून एक निष्क्रिय लस तयार केली. त्याचबरोबर रुग्णांवर या औषधाचा परिणाम होऊ नये म्हणून हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही मृत व्हायरसपासून ही लस विकसित करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने निष्क्रिय लसीचा आतापर्यंतचा रेकॉर्ड चांगला आहे. वाचा- Corona च्या लशीची कदाचित गरजच लागणार नाही - Oxford च्या तज्ज्ञांचा दावा प्राण्यांवर केला गेला प्रयोग COVAXIN लसीचा इतर लसींप्रमाणे प्राण्यांवर प्रयोग करण्यात आला. या ट्रायलमध्ये या लसीचा चांगला परिणाम दिसून आला. प्राण्यांवर चाचणी केल्यानंतरच बीबीआयएलने लसीच्या मानवी चाचणीसाठी CDSCO कडे परवानगी मागितली. आता त्यांना परवानगी मिळाली असून 7 जुलैला पहिल्यांदा ह्युमन ट्रायल होणार आहे. अशी होणार ह्युमन ट्रायल CDSCO कडून ही लस दोन टप्प्यांमध्ये ट्रायलसाठी वापरली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात फार कमी जणांना लसीचा डोस देण्यात येईल. हा डोस किती सुरक्षित आहे, याची तपासणी केली जाणार. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात विविध वयोगटातील शेकडो जणांवर मानवी चाचणी केली जाणार आहे. यातून ही लस नेमकी किती परिणामकारक ठरणार हे तपासले जाईल. वाचा- अमेरिकेत 28 लाख कोरोना रुग्ण; तरी ट्रम्प म्हणतात, ‘कोरोना आपोआप गायब होणार’ संपादन-प्रियांका गावडे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात