जिनिव्हा, 10 मे : जगभरात कोरोनानं थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा परिस्थिती अद्याप एकाही देशाला कोरोनावर यशस्वी लस शोधता आलेली नाही आहे. इस्राइलनं लस शोधल्याचा दावा केला असला तरी, अद्याप त्याच्या निर्मितीवर प्रश्नचिन्ह कायम आहे. या सगळ्यात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एका वादग्रस्त चाचणीला पाठिंबा दर्शविला आहे. या चाचणीमध्ये निरोगी लोकांना कोरोना संक्रमित केले जाईल. यासाठी काही लोकांची मदत WHOने मागितली आहे. मात्र यामुळं लोक गंभीर आजारी पडण्याचा धोका देखील असेल. डेली मेलच्या अहवालानुसार, WHOचे म्हणणे आहे की निरोगी स्वयंसेवकांना कोरोनाची संक्रमण केल्यास, लस तयार करण्याच्या प्रक्रियेस वेग येईल. या कारणास्तव, आरोग्य संघटनेनेही याला नैतिकदृष्ट्या योग्य म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही लसीच्या चाचण्यांबाबत आठ अटी निश्चित केल्या आहेत. या अंतर्गत केवळ 18 ते 30 वर्षे वयोगटातील लोकांना स्वयंसेवक गटात समाविष्ट केले जाणार आहे. वाचा- कोरोनावर चेन्नईमध्ये तयार केलं औषध, मॅनेजरनं स्वत:वरच केली चाचणी आणि… निरोगी लोकांना संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यावर लसीचा काय परिणाम होतो हे पाहणे आव्हानात्मक असल्याचे WHOचे म्हणणे आहे. असे प्रयोग याआधी मलेरिया, टायफाइड, फ्लूच्या लस तयार करण्यासाठी करण्यात आले आहेत. मात्र, या आजारांवर उपचार करण्यासाठी औषधे उपलब्ध होती. निरोगी व्यक्तींना कोरोना संक्रमित केल्यास त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकते. वाचा- डॉक्टरांना सर्वात मोठं यश! ‘ही’ तीन औषधं वापरून 7 दिवसांत बरा झाला कोरोना रुग्ण कोरोनावर अद्याप औषध न सापडल्यामुळं ही चाचणी धोकादायक असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे, निरोगी व्यक्तीला संसर्ग झाल्यानंतर, तो गंभीर आजारी पडल्यास बरा करणे कठीण होईल. दरम्यान, ज्यांना आधीच संसर्ग झाला आहे त्यांच्यावर ही लस चाचणी केली जाते. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि इम्पीरियल कॉलेज लंडन यांनी अशा लोकांवर प्रयोग सुरू केला आहे. दरम्यान, या प्रक्रियेला जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भारतासह जगात कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. रविवारी सकाळी भारतात जवळपास 63 हजार कोरोनाचे रुग्ण आहेत. तर, 2109 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. हाँगकाँगमध्ये ही 3 औषधं वापरून रुग्णांवर उपचार हाँगकाँगच्या 6 रुग्णालयांमध्ये तीन औषधांचे मिश्रण देण्यात आलेल्या 86 लोकांची त्वरेने बरी झाली कारण त्यात तीन अँटीवायरल औषधे होती. यातील प्रथम अँटीवायरल औषध म्हणजे लोपीनावीर-रीटोनाविर (lopinavir-ritonavir-kaletra). रिबाविरिन नावाचे आणखी एक औषधं हे हेपेटायटीस-सीच्या उपचारात वापरली जाते. तिसरे औषध इंजेक्शन आहे. त्याचे नाव इंटरफेरॉन बीटा -1 बी (Interferon Beta-1B) आहे. हे औषध मल्टिपल स्क्लेरोसिस बरे करते जेणेकरून शरीरात वेदना, जळजळ आणि व्हायरस पसरत नाहीत. काही तज्ञांचे मत आहे की इंटरफेरॉन बीटा -1 बी औषध शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कार्य करते. जेणेकरुन मानवी शरीर कोणत्याही विषाणूंविरूद्ध लढू शकेल. वाचा- कंबर दुखायला लागली म्हणून झाला अॅडमिट, CT Scan रिपोर्ट पाहून डॉक्टर हैराण संपादन, संकलन-प्रियांका गावडे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.