हाँगकाँग, 10 मे : देशभरात कोरोना थैमान घालत असताना दुसरीकडे अद्याप कोरोनावर कोणतीही लस मिळाली नाही आहे. या सगळ्या परिस्थितीत हाँगकाँगमधून कोरोना विषाणूच्या उपचारांबाबत एक चांगली बातमी येत आहे. तर, संपूर्ण जग कोरोना विषाणूची औषधे आणि लस तयार करण्यात गुंतलेला असताना हाँगकाँगच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांनी काही औषधांचा वापर करून कोरोना रुग्णावर यशस्वी उपचार केले. या औषधानं 7 दिवसांत रुग्ण बरे ही झाले. न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या वृत्तात, हाँगकाँगच्या 6 शासकीय रुग्णालयांमधील विद्यापीठाच्या संशोधकांनी कोरोना विषाणूची लागण झालेल्या 127 रुग्णांवर औषधांचा वापर केला, असे सांगितले. यापैकी 86 लोकांना तीन औषधांचे मिश्रण देण्यात आले तर 41 लोकांना इतर औषधांचे मिश्रण सामान्य औषधांसह देण्यात आले. डॉक्टरांच्या मते, तीन औषधांचे मिश्रण हे एक चांगले उपचार आहे की नाही यासाठी हा प्रयोग करण्यात आला. वाचा- महाराष्ट्रानं वाढवली मोदी सरकारची चिंता, ‘या’ 5 शहरांमध्ये परिस्थिती चिंताजनक ज्या 86 रुग्णांनांवर तीन औषधांचे मिश्रण देण्यात आले ते 7 दिवसात निरोगी झाले. म्हणजेच कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाचे नंतरचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यांनाला रुग्णालयातून परत घरीही पाठवण्यात आले. तर, दुसरा गटाबाबत अद्याप काही निदान झाले नाही आहे. दरम्यान, तीन औषधांचे हे मिश्रण त्या रुग्णांना देण्यात आले जे कोरोना विषाणूमुळे गंभीर आजारी नव्हते. वाचा- भारताने कोरोनावर वॅक्सिन बनवण्यासाठी उचललं मोठं पाऊल, प्राण्यांवर होणार ट्रायल ही होती तीन औषधं हाँगकाँगच्या 6 रुग्णालयांमध्ये तीन औषधांचे मिश्रण देण्यात आलेल्या 86 लोकांची त्वरेने बरी झाली कारण त्यात तीन अँटीवायरल औषधे होती. यातील प्रथम अँटीवायरल औषध म्हणजे लोपीनावीर-रीटोनाविर (lopinavir-ritonavir-kaletra). रिबाविरिन नावाचे आणखी एक औषधं हे हेपेटायटीस-सीच्या उपचारात वापरली जाते. तिसरे औषध इंजेक्शन आहे. त्याचे नाव इंटरफेरॉन बीटा -1 बी (Interferon Beta-1B) आहे. हे औषध मल्टिपल स्क्लेरोसिस बरे करते जेणेकरून शरीरात वेदना, जळजळ आणि व्हायरस पसरत नाहीत. काही तज्ञांचे मत आहे की इंटरफेरॉन बीटा -1 बी औषध शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कार्य करते. जेणेकरुन मानवी शरीर कोणत्याही विषाणूंविरूद्ध लढू शकेल. वाचा- VIDEO: कोरोनाच्या विळख्यात मुंबईकरांसाठी आली Good News, पहिल्यांदाच घडलं असं संपादन, संकलन-प्रियांका गावडे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.