धक्कादायक! कंबर दुखायला लागली म्हणून झाला अ‍ॅडमिट, CT Scan रिपोर्ट पाहून उडाली डॉक्टरांची झोप

धक्कादायक! कंबर दुखायला लागली म्हणून झाला अ‍ॅडमिट, CT Scan रिपोर्ट पाहून उडाली डॉक्टरांची झोप

डॉक्टरांनी CT Scan केल्यानंतर त्यांना जे काय दिसलं ते पाहून संपूर्ण रुग्णालय हादरलं.

  • Share this:

ब्राझीलिया, 10 मे : शहरी लोकांच्या रोजच्या अति शीघ्र जीवनशैलीमुळे आणि पुरेसा व्यायाम न केल्यामुळं कंबरदुखीसारखे त्रास होतात. आता वर्क फ्रॉम होममुळं तरुण मंडळींनाही कंबरदुखीचा त्रास होऊ लागला आहे. ब्राझीलची राजधानी असलेल्या ब्राझीलियामध्ये असाच एक तरुण कंबर दुखत असल्यामुळं रुग्णालयात गेला. त्याला वेदना सहन होत नसल्यामुळं डॉक्टरांनी अ‍ॅडमिट होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर या तरुणाला CT Scan करण्यास सांगितले. मात्र CT Scan रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांची झोप उडाली.

ब्राझीलिया येथे राहणाऱ्या साओ पाउलो याला अचानक कंबरदुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर डॉक्टरांनी CT Scan केल्यानंतर साओच्या शरीरात दोन नाही तर तीन किडनी (मूत्रपिंड) असल्याचे आढळून आले. सामान्यत: शरीरात दोन किडनी असून प्रत्येकी साधारणपणे 10सेंमी. लांब, 5 सेंमी. रुंद व 4 सेंमी. जाड असतात.

इंडिया टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, 38 वर्षीय साओला स्लिप डिस्कचा त्रास तर नाही ना, अशी शंका डॉक्टरांना होती. त्यामुळं साओचे CT Scan करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. सीटी स्कॅन केल्यानंतर डॉक्टर हैराण झाले. डॉक्टरांनी पाहिले की, उजवीकडे साओला एक नाही तर दोन किडनी आहेत. म्हणजे एकूण साओला तीन किडनी आहेत.

दरम्यान, डॉक्टरांनी साओला याचा काही त्रास होत नसल्याचे सांगितले. तसेच ही रेअर केस असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या डॉक्टरांनी साओला कंबरदुखीबाबत औषधं देण्यात आली आहेत.

आई शप्पथ हे भन्नाट आहे! लॉकडाऊनमध्ये कॅरम खेळण्याची ही पद्धत तुम्ही पाहिली का?

बाप रे! बेसिनमध्ये भांडी घासताना निघाला जगातला सर्वात विषारी साप, पाहा PHOTO

First published: May 10, 2020, 10:11 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading