चेन्नई, 10 मे : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. दुसरीकडे कोरोनावर अद्याप कोणतीही लस किंवा औषध मिळालेले नाही आहे. दरम्यान, डॉक्टर सध्या वेगवेगळी औषधं तयार करत आहे. या सगळ्यात चेन्नईमधील एका कर्मचाऱ्याचा संशोधनादरम्यान मृत्यू झाला. कोरोनाच्या उपचारासाठी बनवलेल्या औषधाची चाचणी या हर्बल प्रोडक्ट बनवणाऱ्या कंपनीतील एका कर्मचाऱ्यानं स्वत:वर केली. मात्र त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. तामिळनाडूतील ही हर्बल कंपनी सर्दीवर औषधं तयार करण्यासाठी ओळखली जाते. इंडिया टूडेनं दिलेल्या वृत्तानुसार, मृत व्यक्तीला औषधाचे ज्ञान असून तो कंपनीत प्रोडक्शन मॅनेजरच्या पोस्टवर होता. कोरोनावर मात करण्यासाठी त्यांनी एक औषध तयार केले होते. मात्र या औषधाची चाचणी मृत व्यक्तीनं आणि त्याच्या बॉसनं स्वत:वर केली. मात्र काही वेळातच त्यांची प्रकृती ढासळली. दोघही चक्कर येऊन कोसळले, त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. वाचा- ग्रीन झोन होत आहेत रेड झोन, 9 दिवसांत ‘या’ 20 जिल्ह्यांत 283 नवीन प्रकरणं दरम्यान, या प्रोडक्शन मॅनेजरच्या मृत्यूनंतर त्यानं जास्त प्रमाणात औषध घेतल्याचे समोर आले. त्यामुळं त्या औषधाचा थेट परिणाम त्यांच्या शरीरावर झाला. तर, त्याच्या बॉसवर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. हाँगकाँगमध्ये ही 3 औषधं वापरून रुग्णांवर उपचार हाँगकाँगच्या 6 रुग्णालयांमध्ये तीन औषधांचे मिश्रण देण्यात आलेल्या 86 लोकांची त्वरेने बरी झाली कारण त्यात तीन अँटीवायरल औषधे होती. यातील प्रथम अँटीवायरल औषध म्हणजे लोपीनावीर-रीटोनाविर (lopinavir-ritonavir-kaletra). रिबाविरिन नावाचे आणखी एक औषधं हे हेपेटायटीस-सीच्या उपचारात वापरली जाते. तिसरे औषध इंजेक्शन आहे. त्याचे नाव इंटरफेरॉन बीटा -1 बी (Interferon Beta-1B) आहे. हे औषध मल्टिपल स्क्लेरोसिस बरे करते जेणेकरून शरीरात वेदना, जळजळ आणि व्हायरस पसरत नाहीत. काही तज्ञांचे मत आहे की इंटरफेरॉन बीटा -1 बी औषध शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कार्य करते. जेणेकरुन मानवी शरीर कोणत्याही विषाणूंविरूद्ध लढू शकेल. संपादन, संकलन-प्रियांका गावडे वाचा- डॉक्टरांना सर्वात मोठं यश! ‘ही’ तीन औषधं वापरून 7 दिवसांत बरा झाला कोरोना रुग्ण वाचा- कंबर दुखायला लागली म्हणून झाला अॅडमिट, CT Scan रिपोर्ट पाहून डॉक्टर हैराण
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.