मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

गाडीचा चेंदामेंदा होऊनही वाचला महिलेचा जीव, Photo पाहून वाटेल आश्चर्य

गाडीचा चेंदामेंदा होऊनही वाचला महिलेचा जीव, Photo पाहून वाटेल आश्चर्य

कार आणि रेल्वे यांच्यात झालेल्या भीषण अपघातातून कारचालक महिला आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. अपघाताचा फोटो अंगावर काटा आणणारा आहे.

कार आणि रेल्वे यांच्यात झालेल्या भीषण अपघातातून कारचालक महिला आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. अपघाताचा फोटो अंगावर काटा आणणारा आहे.

कार आणि रेल्वे यांच्यात झालेल्या भीषण अपघातातून कारचालक महिला आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. अपघाताचा फोटो अंगावर काटा आणणारा आहे.

  • Published by:  desk news
लंडन, 8 डिसेंबर: ज्या अपघातातून वाचण्याची बिलकूल (Major car accident) शक्यता नव्हती, त्यातून एक महिला सहीसलामत बचावल्याची घटना नुकतीच समोर (Saved life) आली आहे. काही अपघात असे असतात की जे अत्यंत भयानक  आणि भीषण असतात. त्या अपघातांचं स्वरूप (Seriousness of an accident) पाहिल्यानंतर त्यातून कुणी वाचू शकेल, याची सूतराम शक्यता दिसत नाही. मात्र तरीही अनेकदा दैव (Survived by luck) बलवत्तर असल्यामुळे किंवा योगायोगाने अनेकजण आश्चर्यकारकरित्या या अपघातातून वाचताना दिसतात. आपण या अपघातातून कसे बचावलो, याचं खुद्द त्या व्यक्तींनाही आश्चर्य वाटत असतं. असाच लंडनमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा भीषण अपघात झााला, मात्र त्यातून ती सहीसलामत बचावली.  आपल्या अपघातग्रस्त कारचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने त्याची कहाणी सांगितली आहे. असा झाला अपघात ही महिला तिच्या कारमधून चाचली असताना वाटेल रेल्वे फाटक होतं. रेल्वे येणाऱ्या काही वेळ अगोदर या फाटकावर रेड सिग्नल लागतो आणि काही वेळाने तो ग्रीन होेतो. रेड सिग्नल लागल्यानंतर फाटक बंद होतं आणि रेल्वे समोरून निघून जाईपर्यंत ते बंद राहतं. रोजच्याप्रमाणं ही महिला कारमधून येत असताना तिला रेल्वे फाटकापाशी रेड सिग्नल दिसला. महिलेनं गाडीचे ब्रेक दाबले मात्र गाडी थांबण्याऐवजी रस्त्यावरून घसरली. रस्त्यावर त्यावेळी मोठ्या प्रमाणात बर्फ जमा झालं होतं. या बर्फामुळे ब्रेक न लागता गाडी स्लिप झाली आणि रेल्वे ट्रॅकवर गेली, असा अनुभव महिलेनं शेअर केला आहे. रेल्वेनं दिली धडक रेल्वे ट्रॅकवरून ही गाडी पास होत असताना रेल्वेची जोरदार धडक बसली. मात्र तोपर्यंत कारचा पुढचा भाग रेल्वे ट्रॅक क्रॉस करून पुढे गेला होता. मागच्या भागाला रेल्वेनं जोरदार धडक दिली. त्यात मागील भागाचा चेंदामेंदा झाला. मात्र त्यावेळी महिला कारमध्ये एकटीच असल्यामुळे आणि ती ड्रायव्हिंग सीटवर बसली असल्यामुळे अपघातातून बचावली. आपला हा अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे वाचा - अनेकांना वाटलं आश्चर्य या महिलेनं शेअर केलेल्या फोटोतील कारची अवस्था पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. इतक्या भीषण अपघातातून कुणी कसं वाचू शकेल, असा प्रश्न लोकांना पडला आहे. या अपघातातून वाचल्याबद्दल लोक महिलेचं अभिनंदन करत असून तिला काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत.
First published:

Tags: Accident, PHOTOS VIRAL

पुढील बातम्या