मुंबई, 8 डिसेंबर : कमी वेळेत जास्त पैसे कमवण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अनेक अवैध मार्ग पत्करतात. त्यात बनावट नोटा छापून बाजारात आणणारे देखील आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहिलं पाहिजे. या सर्व पार्श्वभूमीवर एक व्हिडो सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून व्हायरस होत होता. त्यात 500 रुपयांच्या दोन नोटा (500 rupees note) दाखवण्यात आल्या होत्या. बनावट आणि खरी नोट यातील फरक दाखवण्याचा प्रयत्न त्यात केला जात होता. मात्र तुम्ही तो व्हिडीओ (Viral video) पाहिला असेल आणि त्या व्हिडीओत दाखवलेली 500 रुपयांची बनावट नोट (Fake note) तुमच्याकडेही असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयोगी पडू शकते. सोशल मीडियावर 500 रुपयांच्या नोटेशी संबंधित एक व्हिडिओ समोर येत आहे, ज्यामध्ये तुमच्याकडेही अशी 500 रुपयांची नोट असेल तर तुम्ही सावध राहा, ही नोट बनावट आहे, असे सांगण्यात आले आहे. चला जाणून घेऊया या व्हिडीओमध्ये कोणत्या नोटेबद्दल बोलले जात आहे आणि त्यात किती तथ्य आहे. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये 500 रुपयांच्या दोन नोटांमधील फरक स्पष्ट करताना खरी आणि खोटी ओळख सांगितली जात आहे. या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या नोटांमध्ये हिरव्या पट्टीची जागा दाखवून अलर्ट करण्यात आलं आहे. दोन हजाराच्या नोटा बाजारात कमी का झाल्या? अखेर केंद्र सरकारने खरं कारण सांगितलं व्हिडीओ सांगण्यात येत आहे की 500 रुपयांच्या अशा कोणत्याही नोटेमध्ये, ज्यामध्ये आरबीआय गव्हर्नरच्या स्वाक्षरीजवळ हिरवी पट्टी नसून गांधीजींच्या फोटोजवळ असेल, तर ती बनावट आहे. 500 रुपयांची अशी कोणतीही नोट घेऊ नये.
एक वीडियो में यह चेतावनी दी जा रही है कि ₹500 का ऐसा कोई भी नोट नहीं लेना चाहिए, जिसमें हरी पट्टी आरबीआई गवर्नर के सिग्नेचर के पास न होकर गांधीजी की तस्वीर के पास हो।#PIBFactCheck:
— PIB Fact Check (@PIBFactCheck) December 7, 2021
▶️यह वीडियो #फ़र्ज़ी है
▶️@RBI के अनुसार दोनों ही नोट वैध हैं
विवरण:https://t.co/DuRgmS0AkN pic.twitter.com/SYyxG9MBs6
पीआयबी फॅक्ट चेक पीआयबीने या व्हिडीओबद्दल ट्वीट केले आणि लिहिले की, व्हिडीओमध्ये अशी चेतावणी दिली जात आहे की 500 रुपयांची अशी कोणतीही नोट घेऊ नये, ज्यामध्ये हिरवी पट्टी आरबीआय गव्हर्नरच्या स्वाक्षरीजवळ नसून गांधीजींच्या छायाचित्राजवळ आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार 500 रुपयांच्या दोन्ही प्रकारच्या नोटा वैध आहेत. PPF मध्ये गुंतवणूक बँक, पोस्ट ऑफिसपेक्षा फायदेशीर ठरेल, व्याजदर किती मिळेल? असा कोणताही मेसेज तुमच्यापर्यंत आल्यास, तुम्ही त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी फॅक्ट चेक करू शकता. तुम्ही PIB द्वारे फॅक्ट चेक करू शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल. याशिवाय, तुम्ही व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा ईमेल: pibfactcheck@gmail.com वर व्हिडीओ पाठवू शकता.