मराठी बातम्या /बातम्या /विदेश /हनीमूनला जाताच पतीचं सत्य आलं समोर, आता पत्नीचे कपडे अन् दागिने घालून बनणार नवरीबाई

हनीमूनला जाताच पतीचं सत्य आलं समोर, आता पत्नीचे कपडे अन् दागिने घालून बनणार नवरीबाई

33 वर्षाचा जॅक आणि 30 वर्षाच्या हार्वीनं 2018 मध्ये लव्ह मॅरेज केलं होतं. लग्नानंतर दोघंही हनीमूनसाठी विस्टशायरच्या सेंटर पार्क्समध्ये (Center Parcs in Wiltshire) गेले.

33 वर्षाचा जॅक आणि 30 वर्षाच्या हार्वीनं 2018 मध्ये लव्ह मॅरेज केलं होतं. लग्नानंतर दोघंही हनीमूनसाठी विस्टशायरच्या सेंटर पार्क्समध्ये (Center Parcs in Wiltshire) गेले.

33 वर्षाचा जॅक आणि 30 वर्षाच्या हार्वीनं 2018 मध्ये लव्ह मॅरेज केलं होतं. लग्नानंतर दोघंही हनीमूनसाठी विस्टशायरच्या सेंटर पार्क्समध्ये (Center Parcs in Wiltshire) गेले.

नवी दिल्ली 14 जून: आजकाल लग्नाचा ट्रेंड पुर्णतः बदलला आहे. बऱ्याचदा दोन मुली (Lesbian Couple) एकमेकींसोबत लग्नगाठ बांधतात, दोन मुलं एकमेकांसोबत लग्न (Gay Couple) करतात तर काही लोक आयुष्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात लग्नागाठ बांधतात. असंच आणखी एक प्रकरण आता समोर आलं असून यात तीन वर्षापूर्वी नवरदेव झालेल्या एका व्यक्तीला आता नवरीबाई बनायचं (Transgender Marriage) आहे. हे प्रकरण ब्रिटनमधील आहे.

33 वर्षाचा जॅक आणि 30 वर्षाच्या हार्वीनं 2018 मध्ये लव्ह मॅरेज केलं होतं. लग्नानंतर दोघंही हनीमूनसाठी विस्टशायरच्या सेंटर पार्क्समध्ये (Center Parcs in Wiltshire) गेले. इथेच हार्वीला समजलं, की तिचा पती जॅकच्या आत एक मुलगा नसून मुलगी आहे. ही गोष्ट माहिती झाल्यानंतर मेकअप आर्टिस्ट असलेल्या हार्वीनं त्याला सोडून देण्याऐवजी त्याची साथ देण्याचा निर्णय घेतला. आता दोघंही पुन्हा एकदा लग्नगाठ बांधण्याचा विचार करत आहेत. ज्यात जॅकला आपलं सत्य लपवण्याची गरज नसेल.

जॅक आणि हार्वी यांची ओळख 2007 मध्ये ऑनलाईन झाली होती. 2010 मध्ये ग्राफिक डिझायनर जॅक आणि हार्वीचं नातं प्रेमात बदललं. यानंतर साल 2018 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. 30 नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांनी लग्नगाठ बांधली. २ महिन्यांनंतर जॅकनं आपल्या पत्नीला सांगितलं, की त्याला नेहमीच एक ट्रान्सजेंडर बनण्याची इच्छा होती.

बेपत्ता मुलगी सापडली, अपहरणकर्त्याचा उद्देश ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

त्याची पत्नी हार्वीनं सांगितलं, की तिच्या पतीला वयाच्या 11 व्या वर्षीपासूनच मुलगी बनण्याची इच्छा होती. ही गोष्ट हार्वीला समजली तेव्हा तिनं 45000 पाउंड खर्च करुन आपल्या पतीची सर्जरी करत महिला बनण्यासाठी त्याची मदत केली. तिनं सांगितलं, की जेव्हा तिच्या पतीनं पहिल्यांदा मुलीचा ड्रेस घातला आणि तिनं स्वतःत त्याचा मेकअप केला तेव्हा जॅकवरुन रायना बनल्यावर तिचा पती अत्यंत आनंदी होता.

सापांमध्ये रंगला सामना; एकानं दुसऱ्याला अक्षरशः गिळून टाकलं, पाहा Shocking Video

हार्वी आता रायना म्हणजेच जॅकसोबतच पुन्हा एकदा लग्नगाठ बांधण्याचा विचार करत आहे. ती म्हणाली, की यावेळी आम्ही दोघीही ब्लॅक कलरचा ड्रेस घालणार आणि रायना नवरीप्रमाणं सजून आपलं स्वप्न पूर्ण करणार. दोघांना या गोष्टीचाही आनंद आहे, की सोशल मीडियावरही लोक त्यांना सपोर्ट करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Marriage, Transgender