पुणे, 14 जून: पुण्यात (Pune Crime) अल्पवयीन बेपत्ता मुलगी सापडल्यानंतर एक खळबळजनक खुलासा झाला आहे. शनिवारी कात्रज (katraj) येथून बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी रविवारी पुणे रेल्वे स्थानकात सापडली. धक्कादायक म्हणजे, या मुलीला भीक मागायला लावायच्या उद्देशानं तिचं अपहरण करण्यात आलं होतं. पोलीस तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपहरणाप्रकरणी सर्जेराव उमाजी बनसोडे याला पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानं मुलीच्या पालकांनी भारती विद्यापीठी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. पालकांच्या तक्रारीच्या आधारावर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होती. तसंच पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंर सोशल मीडियावरही मॅसेज देखील पाठवला होता. हेही वाचा- ‘‘राजकारणात पैसाच बोलतो आहे’’, काळ्या पैशांवरुन शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल रविवारी सकाळी रेल्वे स्थानकात एका रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाला बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी एका व्यक्तीसोबत दिसली. जवानाला संशय आल्यानं त्या व्यक्तीला आणि मुलीला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर अपहरणाचा घडलेला सर्व प्रकार समोर आला. सुरक्षा दलानं तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती देऊन आरोपी आणि मुलीला शहर पोलिसांकडे सुपूर्द केलं. सर्जेराव उमाजी बनसोडे असं आरोपीचं नाव आहे. आरोपीची चौकशी केल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. आरोपीचा मुलीला भीक मागायला लावण्याचा हेतू होता. त्यासाठीच तिचं अपहरण केल्याचं आरोपीनं पोलिसांना सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.