नवी दिल्ली 14 जून : सोशल मीडिया (Social Media) हे एक असं माध्यम आहे, ज्यावर रातोरात एखादी गोष्ट प्रचंड व्हायरल (Viral) होते आणि हे अपलोड करणाऱ्याला तितकीच प्रसिद्धीही मिळते. यावर येणारे काही व्हिडिओ लोकांना अक्षरशः हैराण करतात. फेसबुकपासून (Facebook) इन्स्टाग्रामपर्यंत (Instagram) अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असे व्हिडिओ समोर येत असतात, ज्यावर विश्वास बसणंही कठीण असतं. असाच आणखी एक व्हिडिओ मागील काही दिवसांपासून फेसबुकवर प्रचंड व्हायरल होत आहे. दोन सापांचा असा व्हिडिओ तुम्ही आजपर्यंत कधीही पाहिला नसेल. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की दोन सापांमध्ये लढाई सुरु (Two Huge Snakes Fight) आहे. या सामन्यात एक साप हारतो. जो साप हारला त्याला शेवटी दुसऱ्या सापाच्या पोटात जावं लागलं. या सापानं लहान सापाला गिळून घेतल्याचं यात पाहायला मिळतं. सापांच्या लढाईचा आणि त्याच्या परिणामाचा असा व्हिडिओ कदाचित पहिल्यांदाच पाहायला मिळाला असावा. लोकही हा व्हिडिओ पाहून हैराण झाले आहेत. तसं पाहिला गेल्यास कमजोर असणारा अनेकदा हारताना दिसतो. त्यामुळे, यात काही नवल नाही. मात्र, या व्हिडिओमध्ये हार झालेल्या सापाला मृत्यूची शिक्षा मिळाली आहे.
WWE स्टार जॉन सिनाने शेयर केला Photo, विराटचे चाहते झाले कनफ्यूज! हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होत आहे. फेसबुकवर मुरलीवाले हौशला नावाच्या एका व्यक्तीनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ आठ मिनिटांचा असून यातील सापांची लढाई लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. व्हिडिओ आतापर्यंत 70 हजारपेक्षाही जास्त वेळा पाहिला गेला आहे. याशिवाय या व्हिडिओला पाच हजारहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत.