न्यूयॉर्क, 14 डिसेंबर: पोलिसांनी (Police) महिलेच्या (Woman) घरात घुसून ती अर्धनग्न (Half naked) अवस्थेत असताना तिची चौकशी केल्याचं सिद्ध झाल्यामुळे आता तिला 22 कोटी रुपयांची (22 crore) नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने (Court) दिले आहेत. अमेरिकेतील एका कृष्णवर्णीय महिलेनं तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा वाचा फोडली आणि कोर्टात धाव घेतली. पोलिसांचं वागणं चुकीचं आणि बेकायदेशीर ठरवत न्यायालयानं महिलेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. अशी घडली घटना अमेरिकेतील शिकागोमध्ये 2019 साली ही घटना घडली होती. एका आरोपी महिलेच्या घरात लपल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या सूत्राकडून मिळाली होती. त्याला पकडण्यासाठी पोलीस थेट या महिलेच्या घरात घुसले. त्यावेळी महिला कपडे बदलत होती. पोलिसांनी त्याच अवस्थेत महिलेला खेचत बाहेर आणलं आणि तिची चौकशी करायला सुरुवात केली. महिलेनं आपल्याला किमान कपडे तरी घालू द्यावेत, अशी विनंती पोलिसांना केली. मात्र पोलीस काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अर्धनग्न अवस्थेत बराच वेळ पोलिसांनी तिला उभं ठेवलं आणि चौकशी केली. पोलिसांना उमगली चूक महिलेची चौकशी केल्यानंतर काही वेळातच पोलिसांना त्यांची चूक लक्षात आली. आरोपी ज्या घरात लपला होता, ते घर वेगळंच असून आपण चुकून या महिलेच्या घरात शिरल्याचा साक्षात्कार पोलिसांना झाला आणि त्यांनी महिलेच्या घरातून काढता पाय घेतला. मात्र या प्रकारामुळे दुखावल्या गेलेल्या महिलेनं याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला. हे वाचा- बापरे बाप! टॉयलेट सीटवर बसताच कमोडमधून बाहेर आला 5 फूट साप आणि… अंजनेटला न्याय अंजनेट यंगने 12 पोलिसांना प्रतिवादी बनवलं आणि न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयानं तिची बाजू मांडण्याची संधी दिली आणि सर्व साक्षीपुरावे तपासून पाहिल्यानंतर तिचा दावा मान्य केला. पोलिसांच्या चुकीच्या माहितीमुळे महिलेला अपमानित व्हावं लागल्याचं सांगत ती निरपराध असताना तिला भोगाव्या लागलेल्या मनस्तापाची नुकसान भऱपाई म्हणून 29 लाख डॉलरची भरपाई देण्याचा आदेश दिला. भारतीय चलनात विचार केला, तर याची किंमत होते तब्बल 22 कोटी रुपये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.