Home /News /videsh /

मै झुकेगा नही! इम्रान खान यांचा जीव टांगणीला लावणारे पाकिस्तानचे सरन्यायाधीश आहेत तरी कोण?

मै झुकेगा नही! इम्रान खान यांचा जीव टांगणीला लावणारे पाकिस्तानचे सरन्यायाधीश आहेत तरी कोण?

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उमर अता बंदियाल यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरुवातीला त्यांनी पाकिस्तानातील राजकीय घडामोडींची स्वत:हून दखल घेतली. यानंतर लगेचच तीन न्यायाधीशांचे खंडपीठही स्थापन करण्यात आले, जे इम्रान खान सरकारने कायदा आणि संविधानानुसार सर्व काही केले आहे की नाही हे पाहणार आहे.

पुढे वाचा ...
    इस्लामाबाद, 4 एप्रिल : पाकिस्तानमध्ये सर्वोच्च न्यायालय अनेकदा लष्कराची ताकद आणि ढासळलेली लोकशाही यांच्यामध्ये धैर्याने उभे राहताना दिसते. त्यांनी एकदा नाही तर अनेक वेळा अशा गोष्टी केल्या आहेत, त्यामुळे पाकिस्तानचे सर्वोच्च न्यायालय आजही निर्भयपणे न्यायव्यवस्थेची निःपक्षता आणि ताकद जिवंत ठेवत असल्याचे दिसते. सध्याच्या राजकीय घडामोडींवर पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली. इम्रान खान (Imran Khan) यांचं सरकार आणि राष्ट्रपतींनी नॅशनल असेंब्ली (National Assembly of pakistan) विसर्जित केल्याची स्वतःहून दखल घेतली, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आंतरराष्ट्रीय जगातही लोक पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेचे कौतुक करत आहेत. पण, अशी निर्भयता दाखवणारे सरन्यायाधीश उमर अता बंदियाल (Chief Justice of Pakistan Umar Ata Bandial) कोण आहेत. 3 एप्रिल रोजी संध्याकाळी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी पाकिस्तान नॅशनल असेंब्ली विसर्जित केल्यानंतर लगेचच बंदियाल यांनी प्रतिक्रिया दिली होती की, नॅशनल असेंब्लीमध्ये ज्या प्रकारे अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेला आणि त्यानंतर इम्रान खान सरकारच्या शिफारसीनुसार, राष्ट्रपतींनी विधानसभा विसर्जित केली, हे कायदा आणि न्यायालयाच्या कक्षेत येते. तत्काळ तीन सदस्यीय खंडपीठाची स्थापन बंदियाल एवढ्यापुरते थांबले नाही, तर त्यांनी तातडीने तीन सदस्यीय खंडपीठ स्थापन केले, ज्यामध्ये ते स्वतः आहेत. ते 24 तासांत त्यावर सुनावणी करत आहे. असं असलं तरी, पाकिस्तानचे कायदेतज्ज्ञ इम्रान खान सरकारचे पाऊल असंवैधानिक आणि चुकीचे म्हणत आहेत. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालय ज्या प्रकारे पुढे आले आहे, त्यामुळे पाकिस्तानातील सत्ताधाऱ्यांचा विशेषतः इम्रान खान यांचा श्वास नक्कीच अडकला आहे. अविश्वास प्रस्ताव फेटाळणे आणि विधानसभा बरखास्त करणे हे सर्वोच्च न्यायालयाला चुकीचे वाटले, तर देशात निवडणुका घेण्याचा इम्रान यांचा निर्णयही उलटू शकतो. त्याच वेळी नव्या आघाडी सरकारच्या आशाही वाढू शकतात. बंदियाल ताठ कण्याचे न्यायमूर्ती सरन्यायाधीश बंदियाल यांच्या तात्काळ कारवाईमुळे इम्रान खान यांचा जीव नक्कीच टांगणीला लागला असणार. बंदियाल यांना ओळखणाऱ्यांचा असा विश्वास आहे की ते पाठीचा कणा ताठ असलेले न्यायमूर्ती आहे, जे कायदा आणि न्यायव्यवस्थेचा सन्मान आणि प्रतिष्ठा अग्रस्थानी ठेवतात. जनरल मुशर्रफ यांच्याशी देखील सामना 2007 मध्ये जनरल परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानमध्ये सत्तापालट केल्यानंतरच्या काळात बंदियाल हे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यावेळी ते लाहोर उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. सर्व न्यायाधीशांना नवीन घटनेनुसार पुन्हा शपथ घ्यावी लागेल असे सांगण्यात आले, त्यानंतर न्यायमूर्ती बंदियाल हे एकमेव न्यायाधीश होते ज्यांनी तसे करण्यास नकार दिला. वकिलांचे मोठे आंदोलन त्यांच्या बाजूने उभे राहिले. परिणामी त्यांना न्यायाधीशपदी कायम ठेवावे लागले. ..अखेर Imran Khan यांची विकेट पडली, असंख्य नाट्यमय घडामोडींनंतर सत्तेतून 'Out'! दोन महिन्यांपूर्वीच सरन्यायाधीश जेव्हा ते न्यायनिवाडा करतात तेव्हा कुणालाही सोडत नाहीत. प्रत्येक पैलू काळजीपूर्वक तपासतात. दोन महिन्यांपूर्वीच ते पाकिस्तानचे नवे आणि 28वे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत. जेव्हा ते सरन्यायाधीश झाले तेव्हा पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या 51000 हून अधिक खटल्यांचे काय होणार हा सर्वात मोठा प्रश्न होता. अशा परिस्थितीत जेव्हा बंदियाल यांनी पहिल्याच महिन्यात 1761 खटल्यांचे निर्णय दिले, तेव्हा लोकांचा असा विश्वास बसला की ते जलद काम करणारे सरन्यायाधीश आहेत, जे पाकिस्तानची न्यायव्यवस्था मजबूत करतील. वडील मोठे अधिकारी आणि मंत्री होते 63 वर्षीय बंदियाल अशा कुटुंबातील आहेत ज्यात त्यांचे वडील प्रथम लाहोरचे उपायुक्त आणि नंतर 1993 मध्ये काही काळ मंत्री होते. वडील सरकारी सेवेत असल्यामुळे त्यांचं शिक्षण एकाच ठिकाणी झाला नाही. कधी इस्लामाबाद, कधी लाहोर तर कधी रावळपिंडी. मी शेवटच्या चेंडूपर्यंत लढणारा खेळाडू.. इम्रान खान यांचा राजीनामा देण्यास नकार गांधी, नेहरू आणि जिना ज्या महाविद्यालयात शिकले त्याच महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण त्यांच्यात कायद्याची आवड नंतर निर्माण झाली असे दिसते, कारण त्यांनी यापूर्वी कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ते केंब्रिजमध्ये आले. तेथून ते प्रसिद्ध लिंकन इन लॉ कॉलेजमधून बॅरिस्टर अॅट लॉसाठी पात्र झाले. हे तेच लॉ कॉलेज आहे जिथून महात्मा गांधी, नेहरू, सरदार पटेल आणि मोहम्मद अली जिना यांनी कायद्याचे शिक्षण घेतले होते. वकिलीपासून करिअरला सुरुवात बॅरिस्टर झाल्यानंतर ते पाकिस्तानात परतले आणि आर्थिक बाबतीत वकिली करू लागले. 1983 मध्ये, त्यांनी लाहोर उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करण्यासाठी स्वत: ला दाखल केले, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात कायद्याचा सराव सुरू केला. त्यांना पाकिस्तानातील अनुभवी वकील म्हटले जायचे, ते कधी लंडनला जायचे तर कधी पॅरिसला आंतरराष्ट्रीय लवादात खटला लढवायचे. त्यांना कमर्शियल, बँकिंग, टॅक्स, प्रॉपर्टी या विषयात निपुणता आहे. त्यानंतर लाहोर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रदीर्घ काळ प्रॅक्टिस केल्यानंतर 2004 मध्ये त्यांची लाहोर हायकोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर ते तेथील मुख्य न्यायाधीश झाले. त्यानंतर 2014 मध्ये ते पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात आले. सर्वात ज्येष्ठ असल्याने या वर्षी जानेवारीत ते देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सर्वोच्च पदावर बसण्याचं पक्क झालं होतं. पाकिस्तानी पंतप्रधानांचा रडीचा डाव.. म्हणे, अमेरिकेनं धमकी दिली, Imran Khan यांना हटवावं, नाहीतर.. ऐतिहासिक निर्णयाची शक्यता ते 16 सप्टेंबर 2023 पर्यंत पाकिस्तानचे सरन्यायाधीश राहतील. त्यांची सक्रियता सध्या पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. ते लष्करासमोरच आव्हान ठरत आहे. न्यायमूर्ती बंदियाल यांनी याआधीही त्यांच्या देशात अनेक धाडसी निर्णय दिले आहेत, पण अनेकदा तुमच्या कारकिर्दीत असे काही टर्निंग पॉईंट्स येतात, जिथे सर्वांच्या नजरा तुमच्यावर असतात आणि तुम्ही इतिहासाला वळण देण्याच्या स्थितीत असता. सध्या सरन्यायाधीस बंदियाल त्याच स्थितीत आहेत. माघार घेणारी व्यक्ती नाही अर्थात सध्या त्यांच्यावर खूप दबाव असेल, पण पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्राने त्यांच्याबद्दल लिहिलं आहे की त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत ते कधीही झुकणारी व्यक्ती नव्हती. ते अतिशय विनम्रपणे बोलतात, मात्र, कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप सहन करत नाही. पाकिस्तानचे सरन्यायाधीश आता काय निर्णय देतात हे पाहणे बाकी आहे, ज्यावर पाकिस्तानचे भविष्य देखील अवलंबून आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Imran khan, Pakistan

    पुढील बातम्या