Home /News /videsh /

पाकिस्तानी पंतप्रधानांचा रडीचा डाव.. म्हणे, अमेरिकेनं धमकी दिली, Imran Khan यांना हटवावं, नाहीतर..

पाकिस्तानी पंतप्रधानांचा रडीचा डाव.. म्हणे, अमेरिकेनं धमकी दिली, Imran Khan यांना हटवावं, नाहीतर..

सर्वांत मोठी चूक मुशर्रफ यांनी केली ती म्हणजे अमेरिकेची हांजी हांजी करणं. ज्या अमेरिकेला आम्ही मदत केली, त्याच अमेरिकेनं आमच्यावर निर्बंध लादले. कोणालाही आम्ही मदत केली, त्यांनी आम्हाला कधी धन्यवाद दिले नाहीत.

    इस्लामाबाद, 30 मार्च :  अमेरिकेनं कथिरीत्या पत्र दिलं होतं की, इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून हटवल्यानंतर पाकिस्तानला माफ करू. असा ऑफिशिअल डॉक्युमेंट असल्याचा दावा इम्रान यांनी केला. यामध्ये अमेरिकेनं धमकी दिल्याचं सांगितलं. हे पत्र केवळ माझ्याच नाही तर, पाकिस्तानच्या विरोधात होतं. या पत्रात माझ्याविरोधात अविश्वास प्रस्ताव ठेवावा, असं म्हटलं होतं, असा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या भाषणात केला. नवाज शरीफ भारताचे पंतप्रधान मोदींना अनेक वेळा भेटले, असाही आरोप त्यांनी केला. सर्वांत मोठी चूक मुशर्रफ यांनी केली - पाकिस्तानींना बळी चढवलं सर्वांत मोठी चूक मुशर्रफ यांनी केली ती म्हणजे अमेरिकेची हांजी हांजी करणं. आम्ही दहशतवादाविरोधात आहोत. मात्र, पाकिस्तानी लोकांना इतर कुणाच्या तरी युद्धात बळी चढवणं चूक होतं. ज्या अमेरिकेला आम्ही मदत केली, त्याच अमेरिकेनं आमच्यावर निर्बंध लादले. कोणालाही आम्ही मदत केली, त्यांनी आम्हाला कधी धन्यवाद दिले नाहीत. अमेरिकेसाठी पाकिस्तानी लोकांनी बलिदान केलं. मी किंवा भारत जगात कोणाच्याही विरोधात नाही. तसंच, आम्ही काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला नव्हता, तोवर मी भारताच्याही विरोधात नव्हतो. आमचं विदेश धोरण पाकिस्तानी लोकांसाठी होतं. मी पंतप्रधान झाल्यानंतर स्वतःसाठी काही मिळवलं नाही मी पंतप्रधान असलो तरी माझ्या स्वतःच्या आधीपासूनच्या घरात राहतो. अल्लाहने मला सर्व काही दिलं आहे, जेवढं माझ्यासाठी आवश्यक आहे. त्यासाठी मी अल्लाहचा ऋणी आहे. मात्र, नवाज शरीफांकडे पहाल तर पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पाकिस्तानी बँकांमधून कर्ज घेऊन अनेक फॅक्टरीज सुरू केल्या. नंतर कर्जमाफी करून घेतली. पाकिस्तानला आणि इथल्या लोकांना डबघाईला आणून स्वतः श्रीमंत झाले. शिवाय, त्यांना पाकिस्तानात पळता भुई थोडी झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेकदा मदतीसाठी भेटले. मी मात्र, पंतप्रधान होऊन साडेतीन वर्ष झालीत आणि मी माझ्या देशाशी आणि जनतेशी प्रमाणिक राहिलो. मी शेवटच्या चेंडूपर्यंत लढणार विरोधी पक्षाला तर काहीही करून मला हटवायचंच आहे, असं इम्रान पुढं म्हणाले. जे आता सत्तेत येऊ इच्छितात, त्यांना पाकिस्तानचं भलं करायचं नाही. रविवारी अविश्वास प्रस्तावार मतदान होईल. रविवारी या देशाचा 'फैसला' होईल, असं इम्रान म्हणाले. मी राजीनामा द्यावा, असं अनेकांनी म्हटलं. पण मी मैदानातून पळणारा खेळाडू नाही. मला क्रिकेटपटू म्हणून ओळखणाऱ्या लोकांना माहीत आहे. मी शेवटच्या चेंडूपर्यंत लढतो. रविवारी काहीही निर्णय झाला तरी मी नंतर आणखी ताकदीनं पुढं येईन. गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वतंत्र पाकिस्तानात जन्म होणं भाग्याचं आई-वडिलांनी गुलामगिरीच्या वर येऊन स्वातंत्र्य किती मोलाचं आहे, हे सांगितलं. ताकदवान आणि कमकुवत लोक यांच्यासाठी समान कायदा म्हणजे न्याय. यासाठी स्वतंत्र देशात जन्म होणं हे मी माझं भाग्य समजतो. अल्लाहशिवाय कुणाच्याही समोर न झुकणं (म्हणजे पैसा, भीती, व्यक्ती) हे इस्लाम सांगतो. हेच मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं होतं. कोणत्याही प्रकारे कोणाचीही गुलामगिरी करणं चूक आहे. लोकांचा दृष्टिकोन बदलणं हा माझा राजकारणात येण्याचा उद्देश होता. जगात कोणाच्याही विरोधात न जाता पाकिस्तानी लोकांसाठी काम करणं हा उद्देश होता.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Pak pm Imran Khan, Pakistan

    पुढील बातम्या