जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / मी शेवटच्या चेंडूपर्यंत लढणारा खेळाडू.. इम्रान खान यांचा राजीनामा देण्यास नकार

मी शेवटच्या चेंडूपर्यंत लढणारा खेळाडू.. इम्रान खान यांचा राजीनामा देण्यास नकार

imran khan

imran khan

या प्रकरणात पाकिस्तानी लष्कर तटस्थ असल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु, आता असं वृत्त आहे की, देशाची खराब अर्थव्यवस्था पाहता, लष्कराला देशात सर्व पक्षांच्या युतीचं सरकार बनवायचं आहे. मात्र, इम्रान खान यासाठी तयार नसल्याचं सांगितलं जातंय.

  • -MIN READ
  • Last Updated :

इस्लामाबाद, 30 मार्च :  विरोधी पक्षाला तर काहीही करून मला हटवायचंच आहे, असं इम्रान पुढं म्हणाले. जे आता सत्तेत येऊ इच्छितात, त्यांना पाकिस्तानचं भलं करायचं नाही. रविवारी अविश्वास प्रस्तावार मतदान होईल. रविवारी या देशाचा ‘फैसला’ होईल, असं इम्रान म्हणाले. मी राजीनामा द्यावा, असं अनेकांनी म्हटलं. पण मी मैदानातून पळणारा खेळाडू नाही. मला क्रिकेटपटू म्हणून ओळखणाऱ्या लोकांना माहीत आहे. मी शेवटच्या चेंडूपर्यंत लढतो. रविवारी काहीही निर्णय झाला तरी मी नंतर आणखी ताकदीनं पुढं येईन. अमेरिकेनं पत्रातून दिली धमकी.. अमेरिकेनं कथिरीत्या पत्र दिलं होतं की, इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून हटवल्यानंतर पाकिस्तानला माफ करू. असा ऑफिशिअल डॉक्युमेंट असल्याचा दावा इम्रान यांनी केला. यामध्ये अमेरिकेनं धमकी दिल्याचं सांगितलं. हे पत्र केवळ माझ्याच नाही तर, पाकिस्तानच्या विरोधात होतं. या पत्रात माझ्याविरोधात अविश्वास प्रस्ताव ठेवावा, असं म्हटलं होतं, असा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या भाषणात आरोप केला. नवाज शरीफ भारताचे पंतप्रधान मोदींना अनेक वेळा भेटले, असाही आरोप त्यांनी केला. काय म्हणाले इम्रान खान? आई-वडिलांनी गुलामगिरीच्या वर येऊन स्वातंत्र्य किती मोलाचं आहे, हे सांगितलं. ताकदवान आणि कमकुवत लोक यांच्यासाठी समान कायदा म्हणजे न्याय. यासाठी स्वतंत्र देशात जन्म होणं हे मी माझं भाग्य समजतो. अल्लाहशिवाय कुणाच्याही समोर न झुकणं (म्हणजे पैसा, भीती, व्यक्ती) हे इस्लाम सांगतो. हेच मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं होतं. कोणत्याही प्रकारे कोणाचीही गुलामगिरी करणं चूक आहे. लोकांचा दृष्टिकोन बदलणं हा माझा राजकारणात येण्याचा उद्देश होता. जगात कोणाच्याही विरोधात न जाता पाकिस्तानी लोकांसाठी काम करणं हा उद्देश होता. सर्वांत मोठी चूक मुशर्रफ यांनी केली सर्वांत मोठी चूक मुशर्रफ यांनी केली ती म्हणजे अमेरिकेची हांजी हांजी करणं. आम्ही दहशतवादाविरोधात आहोत. मात्र, पाकिस्तानी लोकांना इतर कुणाच्या तरी युद्धात बळी चढवणं चूक होतं. ज्या अमेरिकेला आम्ही मदत केली, त्याच अमेरिकेनं आमच्यावर निर्बंध लादले. कोणालाही आम्ही मदत केली, त्यांनी आम्हाला कधी धन्यवाद दिले नाहीत. अमेरिकेसाठी पाकिस्तानी लोकांनी बलिदान केलं. मी किंवा भारत जगात कोणाच्याही विरोधात नाही. तसंच, आम्ही काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला नव्हता, तोवर मी भारताच्याही विरोधात नव्हतो. आमचं विदेश धोरण पाकिस्तानी लोकांसाठी होतं. पाकिस्तानच्या संसदेत (Pakistan National Assembly) विरोधी पक्षांनी इम्रान खान सरकारच्या विरोधात अविश्वास ठरावावर (No Trust) आणला. पाकिस्तानच्या राज्यघटनेनुसार अविश्वास ठराव मांडल्याच्या 3 दिवसांनंतर आणि 7 दिवसांच्या आत मतदान होणं आवश्यक आहे. पाकिस्तानातील सत्तेचे आकडे बघितले तर इम्रान यांना यापूर्वी 176 खासदारांचा पाठिंबा होता. मात्र 24 खासदारांच्या बंडखोरीनंतर आता केवळ 152 खासदार इम्रान सरकारच्या पाठीशी उभे आहेत. म्हणजेच 342 सदस्यांच्या संसदेत 172 च्या आकड्यापासून इम्रान खान खूपच मागे आहेत. त्यामुळं हे सरकार पडणं जवळपास निश्चितच झालं होतं. पाकिस्तानी लष्कराला काय हवंय? या प्रकरणात पाकिस्तानी लष्कर तटस्थ असल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु, आता असं वृत्त आहे की, देशाची खराब अर्थव्यवस्था पाहता, लष्कराला देशात सर्व पक्षांच्या युतीचं सरकार बनवायचं आहे. मात्र, इम्रान खान यासाठी तयार नसल्याचं सांगितलं जातंय. काही दिवसांपूर्वी ‘द जंग’ वृत्तपत्रात अब्बासी यांचा एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात ते म्हणाले होते ‘देश सध्या अत्यंत कठीण परिस्थितीत आहे. राजकारणी देशाच्या भल्याऐवजी केवळ स्वतःवर लक्ष केंद्रित करत आहेत. अशा वेळी, लष्करानं हस्तक्षेप करायला हवा.’ संसदेचे अध्यक्ष (Speaker) असद कैसर यांना इम्रान यांच्या इशाऱ्यानुसार मतदान पुढं ढकलायचं होतं. तर, विरोधकांना समोर विजय दिसत असल्यामुळं त्यांना यावर लवकरात लवकर निर्णय हवा होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात